जळगाव: जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीने सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागातील ई-निविदा नोटीस क्र.४ व ५ मध्ये अधिकारी व ठेकेदारांनी संगनमताने खोट्या दस्तऐवजांच्या सहाय्याने केलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी संबंधीत अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यावरही केवळ विनय बढे या एकाच मक्तेदारावर गुन्हा दाखल झाला. अन्य दोन मक्तेदार तसेच अधिकाऱ्यांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत? अशी विचारणा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम, पोलिसांना केली आहे. तसेच विधानसभेत हा भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित करणार असल्याने त्यासाठी माहितीही मागविली आहे.सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगाव यांनी २२ जुलै २०१६ रोजी ४१ कामांची आॅनलाईन निविदा सूचना प्रसिद्ध केली. निविदा भरण्याची अंतिम मुदत २६ आॅगस्ट २०१६ ही होती. त्या ४१ कामांपैकी अनुक्रमांक १९ वर बोदवड तालुक्यात राज्य मार्ग क्र.६ ते तळवेल -जुनोने दिगर-आमदगाव-रूईखेडा रस्ता प्रजिमा-२५ वर १९/९३० व २०/८७३ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्याच्या ५४.९३ लाखांच्या कामाचा समावेश होता. मात्र यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मक्तेदार यांनी हातमिळवणी करून बनावट कागदपत्र सादर करून मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्याची व भ्रष्टाचार केल्याची तक्रार विजयकुमार नामदेव काकडे मु.चिखली पो.घोडसगाव ता. मुक्ताईनगर यांनी केली होती. तपासात बनावट कागदपत्र सादर केल्याचे, इतकेच नव्हे तर अधिकारी, कर्मचाºयांच्या संगनमताने बनावट ई-मेल तयार करून त्या आधारे ही खोटे कागदपत्र खरे भासविण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले. याप्रकरणी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी व बनावट कागदपत्र सादर करणाºया ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना ६ जुलै २०१८ रोजी दिले. मात्र त्यानंतरही केवळ ठेकेदार विजय सोनू बढे रा.भुसावळ या एकाच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य ठेकेदारांवर गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत? ते कधी दाखल करणार? अशी विचारणाही खडसे यांनी पत्रात केली आहे.केवळ एकाच कामाचा गुन्हाई-निविदा नोटीस क्र.४ व ५ (२०१६-१७) मध्ये ४१ कामे होती. त्यापैकी केवळ एकाच ५६ लाखांच्या कामासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक सर्व कामे ७ ते ८ कोटींची आहेत. तसेच अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्स, जळगाव, उज्ज्वलकुमार नामदेव बोरसे यांनीही खोटे दस्तावेज सादर केलेले असताना त्यांच्यावरही गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने फिर्याद देताना तत्कालीन अधीक्षक अभियंता पांढरे, लेखापाल तिघरे यांनाही फिर्यादीतून सोयीस्करपणे वगळले आहे. तसेच आणखी कोणी-कोणी बनावट दस्तावेज सादर करून गैरमार्गाने निविदा मिळविल्या आहेत? याचा शोध घेण्याची गरज आहे. खडसे यांनी याप्रकरणी त्वरीत कार्यवाही होऊन अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकाºयांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता परदेशी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशला दिली आहे.विधानसभेत गाजणार मुद्दासार्वजनिक बांधकाम विभागाच्या जळगाव उत्तर विभागातील बनावट दस्तावेजांच्या आधारे कामे लाटण्याचा भ्रष्टाचाराचा मुद्दा व त्यात सहभागी दोषी अधिकाºयांना, मक्तेदारांना पाठीशी घालण्याचा होत असलेला प्रयत्न हा मुद्दा खडसे विधानसभेत उपस्थित करणार असून त्यासाठीची तपशीलवार माहिती त्यांनी जिल्हाधिकाºयांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागविली आहे. त्यामुळे हा मुद्दा विधानसभेत गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बनावट दस्तावेज प्रकरणी सर्व गुन्हेगारांवर गुन्हा का दाखल केला नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:44 PM
माजी मंत्री खडसेंकडून विचारणा
ठळक मुद्दे विधानसभेत करणार सार्वजनिक बांधकाममधील भ्रष्टाचाराचा प्रश्न केवळ एकाच कामाचा गुन्हा