गेल्या सहा-सात महिन्यांत जळगावमध्ये शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिंसासाराच्या, हाणामारीच्या इतक्या घटना घडल्या आहे की, पालकांसह शिक्षकही हादरून गेले आहेत़ विशेष म्हणजे मित्र मैत्रीणींसह शिक्षकांवर थंड डोक्याने हल्ला करणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढतेय व त्यात स्मार्ट फोनचा हात खूप मोठया प्रमाणावर आहे हे वास्तव पोलिसांनिही मान्य केले आहे़ हल्ला करणारी हाणामारीपर्यंत पोहचत शिक्षकांना दुखापत करणारी ही मुले एवढी हिंसक कशी होत आहेत? काय कारण असतील या विस्कटलेल्या मनांमागे शिक्षणतज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांनी या निमित्ताने पौंगडावस्थेतील मुलांच्या मनस्थितीवर आणि एकंदरच समाजावर प्रकाश टाकला पाहिजे़ पण गोंधळलेली ही 'मिनी अॅडल्ट' मुले जी अविचारी कृत्य करून बसताय त्यामागे त्यांचे आसुललेले बालपण हे कारण आहे की पौंगडवस्थेत येण्याचे मुलामुलींचे वय आता खूपच खाली येत चालले आहे, हे खरं कारण आहे़ की मुलांच्या जीवनातील एकाकीपणा वाढलेला आहे हे त्या मागच खर कारण आहे? एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की, शालेय मुलं अतिशय आत्मकेंद्री बनत आहेत, त्यांचे सुख, त्यांच्या इच्छा, त्यांच्या (प्रेमप्रकरणांच्या) समस्या, त्यांच्या तृप्ती यात ती इतकी बुडून गेली की, त्यांना आपल्या पलीकडचे जग, इतरांची सुख:दुख, इतरांच्या गरजा याचे जराही महत्त्व वाटत नाही़ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुसºयाविषयी काही भावनाच न उरल्याने ती हिंसक बनत सरळ शिक्षकांवरच (प्रसंगी आई वडिलांवर) हल्ला करत आहे़ जी बाब खरच चिंताजनक आहे़- चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक
का होतात शाळकरी मुलं हिंसक ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:39 PM