जळगाव : स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांनी मिळून १६ कोटींचा निधी प्रशासनाकडे केवळ कारोनाच्या कामासाठी सुपूर्द केला असताना एवढ्या निधीचे प्रशासनाने केले काय? मनपानेही कोरोनावर खर्च केला; म्हणजे नेमके काय केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असा गंभीर आरोप जळगाव फर्स्ट संस्थेचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला आहे.त्यांनी फेसबुकव्दारे आपले म्हणणे व्हिडिओतून मांडून आरोग्यमंत्री राजेश टोपे अन् पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे.-कोविड रुग्णालयात दिरंगाई तर आहेच; शिवाय समन्वय अन् गतिशिलतेचाही अभाव आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी का होत नाही?-प्रशासनाला एवढा निधी देऊन जवळपास दीड ते दोन महिने झाले अन् लॉकडाउनला ७० दिवस झाले. या ७० दिवसात कोरोनाशी लढा दिला; म्हणजे नेमके प्रशासनाने काय केले?-पीपीई कीट हे ४०० ते ५०० रुपयांना विकत मिळते. अशावेळी जर कोणी ते एक हजार ते बाराशे रुपयांना मिळत असेल असे सांगत असेल तर त्याला माझ्या समोर आणा. खुद्द आरोग्यमंत्रीच ४०० ते ५०० रुपयांना पीपीई कीट मिळते, असे सांगत असताना एवढे महागडे पीपीई कीट आणण्यात तर आले नाहीत ना?-लॉकडाउन सुरू झाल्यास ७० दिवस उलटले, या काळात मनपा आयुक्तांनी काय केले? किती पीपीई कीट विकत घेतले? कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेले सॅनिटायझर, मास्क याची तरी नेमकी किती खरेदी केली? याचे उत्तर द्यावे, असा सवाल चौधरी यांनी केला आहे.
१६ कोटी देऊनही एवढे मृत्यू का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 12:15 PM