बीबीएफ तंत्र : पद्धत अवलंबल्यास अधिक उत्पन्न शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व नानाजी देशमुख कृषी संजीवनी
प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने रूंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्राद्वारे
पेरणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सदरची पद्धत अवलंबल्यास पीक उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते, असा दावा उपस्थित
तज्ज्ञांनी केला.
यावेळी नाशिक विभागीय सहसंचालक संजीव पडवळ,
अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय सहसंचालनालय सुनील वानखेडे, जिल्हा कृषी
अधीक्षक संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी
प्रकल्पाचे संचालक उपसंचालक संजय पवार, जळगावचे तालुका कृषी अधिकारी
श्रीकांत झांबरे, विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी, कृषी
सहायक बालाजी कोळी, प्रकल्प सहायक डी. वाय. महाले आदी उपस्थित होते.
------------------------
फोटो-
कृषी विभागातर्फे आयोजित रुंद वरंबा सरी पेरणी प्रात्यक्षिक प्रसंगी माहिती देताना तज्ज्ञ.