ठळक मुद्देअयोध्यानगरात उघड्या घरातून दोन मोबाइल लांबविलेएमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलउघडे घर पाहून साधली चोरट्याने संधी
जळगाव : पत्नी देवघरात तर पती गच्चीवर प्राणायाम करीत असताना चोरट्यांनी वासुदेव जगन्नाथ जगताप (वय ३५) यांच्या उघड्या घरातून ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी अयोध्यानगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वासुदेव जगताप हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता ते गच्चीवर प्राणायाम करीत होते, तर पत्नी अनिता या देवघरात पूजा करीत होत्या. मुलगा भूषण हा शेवटच्या खोलीत झोपलेला होता. घर उघडे असल्याची संधी साधून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेला पत्नी अनिता यांचा १९ हजार ५०० रुपयांचा तर मुलगा भूषण याचा ९ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला.