ऑनलाईन लोकमतपाचोरा,दि.2 - पती-पत्नी हे सुखदु:खाचे भागीदार असतात. क्वचितच जोडप्यांची पूर्ण जीवनभर साथ एकमेकांना लाभते. सोबत तर जगलेच पण मृत्यूही जवळपास सोबतच आल्याची घटना 2 रोजी पाचोरा तालुक्यात घडली. नाचणखेडा, ता पाचोरा येथील भावसिंग गणसिंग पाटील (वय 73) व अलकाबाई भावसिंग पाटील (वय 68) हे वृद्ध दाम्पत्य पाचोरा येथील जयकिसन सोसायटीत ब:याच वषार्पासून एकटेच राहत होते. 2 मुले नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याने वृद्ध आजी -आजोबा एकमेकांना सहारा देत जीवन जगत होतेरविवारी पहाटे 2.30 वाजता काही दिवसांपासून किरकोळ आजाराने ग्रस्त असलेले भावसिंग गणसिंग पाटील यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने काही तासातच म्हणजे दुपारी 4.30 वाजता कर्करोगाने आजारी असलेल्या अलकबाई भावसिंग पाटील यांचेही निधन झाले. दोघांचेही जीवापाड असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्य़क्त केली. दोघांनाही सोबतच अग्निडाग दिला.
पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचे निधन
By admin | Published: July 02, 2017 5:44 PM