चाळीसगाव, जि. जळगाव : शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर पश्चिमेला असणा-या करगाव तांडा क्र. ४ येथे दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीचा खून केला. ही थरारक घटना बुधवारी पहाटे सव्वासहा वाजता घडला.आत्माराम ऊर्फ अप्पा काळू जाधव (वय ५०) याने आपली पत्नी संगीता ऊर्फ सखुबाई आत्माराम जाधव(वय ४०) हिच्याकडे बुधवारी पहाटे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार देताच आत्मारामने लोखंडी पट्टीचा प्रहार तिच्या डोक्यावर केला. यात संगीता जागीच ठार झाली. पहाटे घडलेल्या या थराराने करगाव तांड्यात एकच खळबळ उडाली. चेतन आत्माराम जाधव (वय १५) याच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:20 PM