उटखेडा, ता.रावेर, जि. जळगाव : सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.‘मे’ महिन्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. प्रत्यक्षात सूर्य आग ओकत असल्याने सातपुड्यातील सर्व नैसर्गिक पाणीसाठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.सातपुडा जंगलातील निवास सोडून येणाऱ्या या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्राण्यांची जीवितहानी होण्याआधीच वनविभागाने या जंगलात कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत. आधीच प्राण्यांच्या संख्येत घट झालेली आहे. जेमतेम शिल्लक असलेले हरिण, सांबर, माकड, लांडगे, कोल्हे, बिबटे, ससे, मोर आदी प्राण्यांची पाण्यासाठी दमछाक होत असल्याने या प्राण्यांना मुकण्याची वेळ आली आहे. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय करून कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत व या प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.
सातपुड्यात पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 4:18 PM
सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.
ठळक मुद्देनैसर्गिक पाणीसाठे आटलेकृत्रिम पाणीसाठ्यांची गरजवनविभागाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे