शहर स्वच्छ व सुंदर करण्याची संकल्पना, शहराच्या प्रगतीचा, नवा इतिहास घडावा यासाठी नागरिकांनी भाजपला जवळ केले़ मात्र, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे मनापा दुबळी झालेली आहे़ नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील गल्ली गल्लीत अधिकाऱ्यांसोबत भेट द्यावी, तेथील नागरिकांच्या समस्या त्यांच्या गरजा, त्यांच्या उणिवा, त्रृटी, दोष, अतिक्रम इत्यादींचा अहवाल मनास द्यावा, असे झाल्यास तक्रारी कमी होती़ गटनेत्यांनी आपली जबाबदारी कोणतीही बडेजाव न करता पार पाडावी, प्रभाग समितीच्या सभापतींनी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रात दरवर्षी क्षेत्रसभा घेणे आवश्यक आहे. अशा सभा न झाल्यास ती समिती अपात्र ठरते़ नोकर भरतीची प्रक्रिया अंमलात आणावी, अप्रशिक्षित, हलगर्जी कर्मचाºयांवर वचक असावा़ हुडको मनपाला डिआरटीचा धाक दाखवते, मनपा घाबरून पैसा भरते, पैसा जास्त भरला की कमी भरला हे बघितले जात नाही़ कर्जाचा व परताव्याचा हिशेब ठेवणे, हुडकोला हिशोबाचा तपशील मागणे व परताव्याची त्यांच्या हिशोबाची तुलना करणे, त्यात काही त्रुटी दिसून आली तर हुडकोला नोटीस बजावणे ई पत्रव्यवहार करणे कामी एका जबाबदार अधिकाºयावर जबाबदारी मनपाने सोपविली नाही़ या कर्ज प्रकरणाची विश्ोष फाईल तयार झाली नाही़ उच्च न्यायालयाला कोणता पुरावा दाखवणाऱ यात त्वरा करा साधारण जनता अस्थिर आहे़ आमदार,खासदार, नगरसेवक यांच्या नातेवाईकांना कामे देऊ नये, वरील प्रमाणे सुधार न झाल्यास जळगाव शहर स्वच्छ व सुंदर कधी होणार नाही. जळगाव शहर स्मार्ट न झाल्यास मतदारांकडे मत मागण्यास जाणार नाही, असे म्हणणारे मंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळावा़- बलवंत चौधरी, ज्येष्ठ नागरिक
शहर स्वच्छ, सुंदर कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:30 PM