जळगाव : हुडकोच्या कर्जापोटी डीआरटी कोर्टाच्या आदेशाने मनपाच्या ३ बँकामधील ४० हून अधिक खाती सील करण्यात आली असून २ जुलै पर्यंत मनपाचे सर्व व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणी २ रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यात मनपाच्या बाजूने निर्णय आला तरच दिलासा मिळेल.हुडकोप्रकरणी मनपाची खाती सील झाल्यामुळे मनपा प्रशासनासह सत्ताधारी देखील हादरले आहेत. मनपाचे सध्यस्थितीस सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. डिआरएटीने कोर्टाने जानेवारी २०१९ मध्ये मनपाची याचिका फेटाळल्यानंतर मनपाने मुंबई उच्च न्यायालयात पुर्नविलोकन याचिका दाखल केली होती. या प्रकरणी २ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तसेच याच सुनावणी दरम्यान मनपा प्रशासनाकडून उच्च न्यायालयात मनपाच्या खात्यांचे सील उघडण्यासाठीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.विधानसभेत हुडकोच्या कर्चाचा विषयहुडकोच्या थकीत कर्जाच्या विषयावरून महापालिकेचे बॅँक खाते सील करण्यात आले. याप्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी गुरूवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. महापालिकेचे सर्व बॅँक खाते हुडकोने सिल केले असल्याची माहिती दिली. या प्रश्नी लवकरात लवकर मार्ग काढावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शहराने आता किती भोग भोगावेमनपाला आतापर्यंत एकही प्रश्न सोडविता आला नसून, गाळे, समांतर रस्त्यांचा प्रश्न असो वा हुडकोचा अजूनही कायम आहेत. त्यातच मनपाची जलवाहिनी वर्षातून २०० वेळ फुटते. आधीच्या नगरसेवकांना नाव ठेवले जात होते, मात्र आताचे नगरसेवक देखील सारखेच असून, जळगावकरांनी आता करावे तरी काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.-प्रा.शेखर सोनाळकर
जळगाव मनपाचे व्यवहार २ जुलैपर्यंत राहणार ठप्प ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:25 PM