लोकसभा निवडणूक असो की स्थानिक निवडणुका असोत जिल्ह्यात काँग्रेस पक्ष नेहमी पिछाडीवर राहिला आहे, मग तो जागा वाटपाचा मुद्दा असेल किंवा निवडणुकीतील यशाचा मुद्दा असेल. याला जबाबदार स्थानिक संघटना मजबूत नसणे, सूक्ष्म नियोजन नसणे समित्यांवर पदाधिकारी नसणे अशी ढीगभर कारणे समोर येतील, मात्र, काँग्रेसकडून वर्षानुवर्षे याबाबत ठोस काहीच होत नाही, कदाचित चौकटीत कामे करायची तेवढ्याच निवडणुका लढायच्या, असे पक्षाने जिल्ह्यात ठरवून ठेवले की काय, असा संदेश काँग्रेसच्या पक्षसंघटनेसाठी कधीच न होणाऱ्या हालचालीवरून दिसतो...नुकतीच प्रदेशवर आमदार शिरीष चौधरी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. चारवरील ही संख्या दोनवर आली आहे, मात्र, ही निवड स्थानिक पातळीवर काँग्रेससाठी किती लाभदायी ठरेल, हे आगामी निवडणुकांमध्ये समोर येईलच, मात्र चार पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत एकमेव निवड झाल्याने हे एक आव्हान आमदार शिरीष चौधरी यांच्यासमोर राहणार आहे.
काँग्रेसमध्ये नेते कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, असे एका नेत्यांनीच एका बैठकीत मार्गदर्शन करताना म्हटले होते. हे काँग्रेसचे वास्तव आहे. गेल्या कार्यकारिणीत काँग्रेसला प्रदेशवर चार पदे मिळाली होती. यात एक उपाध्यक्ष, एक सचिव, दोन सरचिटणीस अशी पदे होती. यंदा ही संख्या एकवर आली. विधानसभा निवडणुकीत एक जागा लढले आणि विजयी झाले. शंभर टक्के यश मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंद आहेच, मात्र या आनंदाचा विस्तार करण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना तेवढा रस नाही, असे एकत्रित चित्र आहे. वरिष्ठ पातळीवरून प्रभारी येतात बैठका घेतात, मात्र ग्राऊंड लेव्हलला म्हणायला काँग्रेस आहे कुठे, हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. पक्षसंघटना वाढीशिवाय पर्याय नाही, केवळ निवडणुकांच्या तोंडावर पक्ष वाढविण्याच्या हालचाली झाल्यास त्याला यश येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. काँग्रेसला एक जागा जिंकल्याने अस्तित्वाच्या लढाईत काहीसे यश आले असले तरी ही लढाई कायम राहणारच आहे. एक महानगराध्यक्षपदाची निवड काँग्रेसकडून दीड वर्षापासून होत नाही. यासाठी साजेसा उमेदवार नाही की अन्य काही या पक्षाच्या अंतर्गत बाबी मात्र, यामुळे संघटना वाढीत येणाऱ्या अडचणी या पक्षापुढील आव्हाने अधिक वाढविणाऱ्या आहेत. प्रदेशवर पद भेटले मात्र स्थानिक संघटनेचे काय, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. लोकसभा निवडणूक असो की स्थानिक निवडणुका असोत जिल्ह्यात काँग्रेस पक्ष नेहमी पिछाडीवर राहिला आहे, मग तो जागा वाटपाचा मुद्दा असेल किंवा निवडणुकीतील यशाचा मुद्दा असेल. याला जबाबदार स्थानिक संघटना मजबूत नसणे, सूक्ष्म नियोजन नसणे, समित्यांवर पदाधिकारी नसणे अशी ढीगभर कारणे समोर येतील, मात्र, काँग्रेसकडून वर्षानुवर्षे याबाबत ठोस काहीच होत नाही, कदाचित चौकटीत कामे करायची, तेवढ्याच निवडणुका लढायच्या, असे पक्षाने जिल्ह्यात ठरवून ठेवले की काय, असा संदेश काँग्रेसच्या पक्षसंघटनेसाठी कधीच न होणाऱ्या हालचालीवरून दिसतो. नुकतीच प्रदेशवर आमदार शिरीष चौधरी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. चारवरील ही संख्या दोनवर आली आहे, मात्र ही निवड स्थानिक पातळीवर काँग्रेससाठी किती लाभदायी ठरेल, हे आगामी निवडणुकांमध्ये समोर येईलच, मात्र, चार पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत एकमेव निवड झाल्याने हे एक आव्हान आमदार शिरीष चौधरी यांच्यासमोर राहणार आहे.
काँग्रेसमध्ये नेते कार्यकर्त्यांना वेळ देत नाही, एका बैठकीत मार्गदर्शन करताना म्हटले होते. हे काँग्रेसचे वास्तव आहे. गेल्या कार्यकारिणीत काँग्रेसला प्रदेशवर चार पदे मिळाली होती. यात एक उपाध्यक्ष, एक सचिव दोन सरचिटणी अशी पदे होती. यंदा ही संख्या एकवर आली. विधानसभा निवडणुकीत एक जागा लढले आणि विजयी झाले, शंभर टक्के यश मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंद आहेच, मात्र, या आनंदाचा विस्तार करण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना तेवढा रस नाही, असे एकत्रित चित्र आहे. वरिष्ठ पातळीवरून प्रभारी येतात, बैठका घेतात, मात्र ग्राऊंड लेव्हलला म्हणायला काँग्रेस आहे कुठे, हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. पक्षसंघटना वाढीशिवाय पर्याय नाही, केवळ निवडणुकांच्या तोंडावर पक्ष वाढविण्याच्या हालचाली झाल्यास त्याला यश येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. काँग्रेसला एक जागा जिंकल्याने अस्तित्वाच्या लढाईत काहीसे यश आले असले तरी ही लढाई कायम राहणारच आहे. एक महानगराध्यक्षपदाची निवड काँग्रेसकडून दीड वर्षापासून होत नाही. यासाठी साजेसा उमेदवार नाही की अन्य काही या बाबी पक्षाच्या अंतर्गत बाबी मात्र, यामुळे संघटना वाढीत येणाऱ्या अडचणी या पक्षापुढील आव्हाने अधिक वाढविणाऱ्या आहेत. प्रदेशवर पद भेटले मात्र, स्थानिक संघटनेचे काय, असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
(((((((((((((टीप -मॅटर रिपिट झाले आहे. कृपया पाहून घेणे)))))))))))