फैजपूर, ता.यावल : जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले.कार्यशाळेचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे उपस्थिती होत्या.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, शेतीला पूरक व्यवसाय करणे आता काळाची गरज आहे. माणसाची प्रकृती बिघडल्यास आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो तसे माती, पाणी परीक्षण झाल्यास त्याचा फायदा शेतीला होईल. त्यांनी शेळगाव बॅरेज प्रकल्पाला ७०० कोटींचा निधी बळीराजा योजनेंतर्गत राखून ठेवला असून, येत्या जून-जुलैमध्ये पाणी अडविले जाईल.माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात अटल कृषी कार्यशाळा ही संकल्पना चांगली असून, शाश्वत शेती, योग्य सिंचन, चांगली बाजारपेठ जोपर्यंत शेतकºयांच्या दरवाजापर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी उत्पादन मालाला योग्य भाव हासुद्धा कायदे होणे अपेक्षित आहे. लघुउद्योग व्यवसाय करणाºया शेतकºयांना १०० टक्के प्रोत्साहन देण्याची मागणी केली.राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात एवढे मंत्री एकत्र व्यासपीठावर येणे मुश्कील आहे, तेव्हा सर्वांनी स्वार्थाबरोबर परमार्थही करावा, अशी मिश्किली करत या कार्यशाळेचे कौतुक केले. कार्यशाळेतून शेतकºयांनी केवळ भाषणे ऐकून न जाता त्याची अंमलबजावणी करावी. त्याचवेळी शेतकºयांचे जीवनमान उंचावेल, असे सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही : अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:40 PM
जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले.
ठळक मुद्देशेळगाव बॅरेजला निधी राखीवशेतकऱ्यांना १०० टक्के प्रोत्साहन देण्याची मागणीजून-जुलैमध्ये पाणी अडविले जाईल.