जळगाव - भाजपाच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या निधनामुळे भाजपाने रॅली रद्द करत, सागरपार्क मैदानावर युतीचा संयुक्तीक मेळावा घेवून आपले शक्तीप्रदर्शन केले. मेळाव्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपा व शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा-शिवसेनेतील कार्यकर्त्यांमधील वैमनस्य दूर करागेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना एकमेकांविरोधात लढल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. मात्र, आता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा करून युती केली असून, आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांमधील वैमनस्य दुर करण्याचे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. लहान निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेशी युती करत नाही, हा समज खोटा असून आता जि.प. व मनपामध्ये देखील शिवसेनेला सत्तेत वाटा देणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी केली.खडसेंची अनुपस्थितीया मेळाव्याचा प्रसंगी जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची उपस्थिती होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची अनुपस्थिती दिसून आली. एका बैठकीनिमित्त ते मुंबईला गेले असल्याची माहिती रक्षा खडसे यांनी या मेळाव्यात दिली. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या निधनामुळे भाजपाने कोणताही गाजावाजा व रॅली न काढण्याचा निर्णय घेतला. पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करूनच मेळाव्याला सुरुवात झाली.देशासाठी निवडणूक महत्वाचीया मेळाव्यात गुलाबराव पाटील, रक्षा खडसे, स्मिता वाघ, आमदार चैनसुख संचेती व माजी आमदार चिमणराव पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी व देशासाठी महत्वाची निवडणूक असल्याचे सांगितले.