लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : दुरुस्तीचे काम करीत असताना विद्युत खांबावरून कोसळल्याने चिंतामण बाजीराव पाटील (वय ६०, मूळ रा.पष्टाणे ह.मु.धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी धरणगावातील गुजराथी गल्लीत घडली. सोमवारी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पाटील हे वीज कंपनीत वायरमन होते, मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली, तरीही ते महावितरणची कामे करीत असल्याची माहिती पाटील यांचे भाऊ अशोक पाटील यांनी दिली.दरम्यान, घटना घडल्यानंतर महावितरणच्या अधिकाºयांनी धाव घेतली. त्यांना तातडीने जळगाव येथे खासगी दवाखान्यात आणण्यात आले, मात्र डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई तसेच संदीप, नीलेश व राहुल हे तीन मुले आहेत. राहुल हा अविवाहित आहे. जिल्हा पेठचे हवालदार पुरुषोत्तम वागळे यांनी पंचनामा केला. शून्य क्रमांकाने हा गुन्हा धरणगावला वर्ग होईल.
खांबावरून कोसळल्याने वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:19 AM
दुरुस्ती करताना अपघात : निवृत्ती घेऊनही करीत कामे
ठळक मुद्देपोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदतीन वर्षांपूर्वी घेतली होती स्वेच्छानिवृत्तीडोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू