कळमसरे, ता.अमळनेर : येथील विजवितरण कंपनीच्या ऊपकेंद्रांतर्गत एकलहरे, एकतास गावाचे वीज तंत्रज्ञ राकेश अरूण साळुंखे (वय २५, रा.मारवड) हे कळमसरे गावाजवळील विजेच्या खांबावरून पडल्याने त्याचे निधन झाले.सदरची घटना २३ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान घडली. राकेश हा एकुलता असून बहीण व आईसोबत राहत होता.नुकताच त्याचा साखरपुडा झाला मात्र लॉकडाऊनमुळे विवाह लांबणीवर गेला होता. बारामती येथे विज तंत्रज्ञ म्हणून काम केल्यानंतर कळमसरे ऊपकेंद्रांतर्गत एकलहरे व एकतास या गावासाठी त्याची नेमणूक झालेली होती.बोहरे फिडर अंतर्गत कळमसरे ,पाडळसे,मारवड,बोहरे इ.शेतीपंपाचे कनेक्शन सुरळीत होणेसाठी कळमसरे गावाजवळील मुख्य विज जोडणी असलेल्या शेतातील खांब्यावर मयत राकेश हा काम करीत होता.
विजेच्या खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 2:51 PM