जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुक रिंगणातून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅंक ही शेतक-यांची बॅंक असून याठिकाणी शेतक-यांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ही माघार घेण्यात येत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
जिल्हा बँकेसाठी २१ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची सोमवारी शेवटची मुदत होती. २१ जागांसाठी एकूण १४९ उमेदवारी अर्ज होते. मात्र माघारीच्या दिवशी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, माजी खासदार ए.टी.पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बॅंक ही शेतक-यांची बॅंक आहे. याठिकाणी शेतक-यांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी भाजपचे सर्वच उमेदवार माघार घेत आहेत.सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष भाजप.