पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडल्याने मजुरांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम मंगळवारी सकाळी बंद पाडले. जामनेर तालुुक्यातील पाळधी परिसरात हा प्रकार घडला.आधीच जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. या परिसरात पाळधीकडून नेरी-जळगावकडील रस्त्याचे काम करीत असलेल्या मजुरांची गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडली आहे. मजुरी न मिळाल्याने मजूर संतप्त झाले. मजुरी मिळण्यासाठी त्यांनी कामावरील कंत्राटदार, अभियंते यांना वेळोवेळी सूचित केले. मात्र मजुरी मिळाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी मंगळवारी सकाळी काम बंद पाडले.संतप्त झालेल्या मजुरांनी ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सुनसगाव, ता.जामनेर येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.विशेष म्हणजे मजुरांसोबतच अभियंते, पर्यवेक्षक, वाहनचालक, रोलरचालक, गवंडी इत्यादींचेही वेतन मिळालेले नाही.दर महिन्याला पुरेसा निधी मिळत नसल्याने मजुरांचे पगार होत नाही. रस्त्याच्या कामाचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे कामगारांना वेळेवर पगार देऊ शकले नाही. तरी १० फेब्रुवारीपर्यंत सर्व मजुरांचे पगार दिले जातील.-किरण चौधरी, प्रोजेक्ट मॅनेजरगेल्या चार-पाच महिन्यांपासून काम करीत आहे. आजपर्यंत आम्हाला एक रुपयाही पगार मिळालेला नाही. महिना संपल्यानंतर पगारासाठी गेले तर पुढील महिन्यात या, असे करीत चार ते पाच महिन्यांचे पगार थकलेले आहे. पगार जर मागितले तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या मालाला पैसे आहेत, पण मजुराला पैसे देण्यासाठी नाही. - विशाल सुरवाडे, मजूर, रा.शिंदी सुरवाडे, ता.बोदवड
मजुरी रखडल्याने मजुरांनी महामार्गाचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:28 PM
गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडल्याने मजुरांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम मंगळवारी सकाळी बंद पाडले. जामनेर तालुुक्यातील पाळधी परिसरात हा प्रकार घडला.
ठळक मुद्देआधीच काम संथ गतीनेपुरेशा निधीअभावी अडचणीचार-पाच महिन्यांपासून वेतनच नाही