शहरात गेल्या महिन्यात झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात दुर्गेश आत्माराम सन्यास उर्फ पपई (रा. शाहूनगर) याला १० नोव्हेंबर रोजी, तर माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याच्या खून प्रकरणात आकाश मुरलीधर सपकाळे (२३, रा.कांचननगर) याला २१ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. ४ नोव्हेंबर रोजी राकेशचा खून झाला होता, त्यात चार आरोपींना अटक झाली होती, मात्र आकाश पोलिसांना सापडत नव्हता. एलसीबीने त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक नेमले होते. या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला दीपक चैनराज ललवाणी (३२, रा. मुसळी फाटा, ता. धरणगाव) व दीपक भिका चव्हाण (३२,रा. इंद्रनील सोसायटी) याला २५ नोव्हेंबर रोजी अटक केली. घरफोडीचे ९ गुन्हे उघडकीस आणून १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ मोबाइल, सोने-चांदीचे दागिने, दुचाकी, तलवार, नकली पिस्तूल, एलसीडी टीव्ही असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीच्या १४ गुन्ह्यांमध्ये १९ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २६ दुचाकी, १ कार व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. त्याशिवाय नितेश मिलिंद जाधव (२१, रा. पिंप्राळा) याच्याकडून १ गावठी पिस्तूल, आकाश माधव सानप व महेश निवृत्त सानप (रा. सिन्नर) या दोघांकडून १ पिस्तूल, ४ जिवंत काडतूस व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. त्याशिवाय अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर, चॉपर हस्तगत करण्यात आले आहे.
अशी आहे कामगिरी
गुन्ह्याचा प्रकार उघड गुन्हे अटक आरोपी
खून २ २
जबरी चोरी १ २
घरफोडी ९ १३
चोरी १४ १९
शस्र २ ३
इतर ९ ११
एकूण ३७ ५०