संजय पाटील लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.8 : मुलींची संख्या कमी झाल्याने दिवसेंदिवस लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे, त्यामुळे मुली विकत घेऊन लग्न करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. मात्र अशाच एका प्रकरणात मुली विकणा:या टोळीने अल्पवयीन मुलगी विकल्याने जळगाव जिल्ह्यातील दोघांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. बलात्कार व अपहरणाच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली आहे पोलीस सूत्रानुसार, भंडारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला शिल्पा नावाची एक महिला आणि कांतिक मेश्राम यांनी ललिता व प्रकाश म्हस्के यांच्या मदतीने दिल्ली येथील विजय सिंघल याला विकून त्याच्याशी लग्न लावले. सिंघल त्या मुलीला दिल्लीला घेऊन गेला. तेथे प}ी म्हणून त्यांचे शारीरिक संबंध आले. नंतर शिल्पा व कांतिक हे दिल्ली येथे गेले व त्यांनी मुलीची आई आजारी असल्याचे सांगून तिला परत शिल्पाच्या गावी लाखनी येथे आणले. तेथे शिल्पा व कांतिकने दुस:या पुरुषांकडून पैसे घेऊन पीडित मुलीवर शारीरिक अत्याचार केले. नंतर शिल्पा, मेश्राम, प्रकाश म्हस्के यांनी तिला जळगाव जिल्ह्यात आणून एरंडोल येथील संजय उर्फ दीपक शिवाजी महाजन याला विकून त्याच्याशी लग्न लावले. तीन दिवसांनंतर पुन्हा शिल्पा व कांतिक हे परत आले व त्यांनी मुलीची आई वारली असे सांगून तिला परत नेले आणि पुन्हा लाखनी येथे त्या मुलीवर वेगवेगळ्या पुरुषांकडून पैसे घेऊन अत्याचार केले गेले. एवढेच नव्हे तर कांतिक, संदीप फंदे, विनोद गायधने यांनीही तिच्यावर अत्याचार केले. काही दिवसांनंतर किरण समरीत, बाबा मेहर या दलालांकडून पुन्हा या मुलीला जळगाव जिल्ह्यात आणून अमळनेर तालुक्यातील कंडारी येथील समाधान दगडू पाटील याच्याकडून पैसे घेऊन मंदिरात त्याच्याशी लग्न लावले. काही दिवसांनी परत लाखनीला तिला नेण्यात आले. त्या दरम्यान समाधान पाटील याने अमळनेर पोलिसात प}ी पळून गेल्याची तक्रार करण्याचा प्रय} केला, परंतु पो. नि. विकास वाघ यांना शंका आल्याने त्यांनी मुलगी अल्पवयीन होती की काय ? हे प्रत्यक्ष ती मुलगी समोर आल्यावर समजेल म्हणून गुन्हा नोंदविण्यापेक्षा थोडे थांबा असा सल्ला दिला. त्यामुळे समाधान पाटील परत गेला. दरम्यान, तिकडे पुन्हा पीडित मुलीला जोधपूर येथील सुरेश अग्रवालच्या मध्यस्थीने राकेश जैन (रा.बाडमेर, राजस्थान) याला विकून त्याच्याशी विवाह लावला. या दरम्यान, प्रत्येकाने प}ी म्हणून पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. अत्याचाराचा कळस झाल्यामुळे ही मुलगी व तिच्या आईने जवाहरनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी प्रकरणाचा छडा लावून अमळनेर व एरंडोल पोलिसात नोंद करून समाधान व महाजन यांना अटक केली. या प्रकरणात एकूण 5 वेळा मुलीला विकण्यात आले होते. तिचे सर्व पती आणि दलालासह सर्व आरोपींविरुद्ध भादंवि 363, 366 (अ), 372, 376 (आय) (जे) (के) (एन)व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे जवाहरनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसरा कोण? या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील तिसरा आणखी एक जण असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यालाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पो. नि. सुरेशकुमार घुसर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले खान्देशात लग्नाला मुली मिळत नसल्याने मुली विकत आणून विवाह लावण्याचे प्रकार वाढले आहेत. अमळनेर तालुक्यात असे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र काही दिवसात या विकत आणलेल्या मुली पैसे घेऊन पळून गेल्याचे प्रकारही घडले आहेत . काहींची पोलिसात तक्रार आहे तर काहींनी अब्रू जाऊ नये म्हणून तक्रार करणे टाळले आहे. चंद्रपूर, भंडारा , पंढरपूर या भागातील बहुतेक दलालांकडून मुली विकून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत . एकंदरीत फक्त बायको पाहिजे म्हणून कोणतीही चौकशी न करता बायको विकत घेणा:या जळगाव जिल्हयातील दोघांना चांगलेच महाग पडले असून तुरूंगाची हवा खावी लागली आहे.
बायको विकत घेणे पडले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 6:00 PM
भंडारा जिल्हय़ातील अल्पवयीन मुलीचे पैशांपोटी तब्बल पाच जणांशी लगA लावून देणा:या टोळीसह जळगाव जिल्हय़ातील कंडारी ता. अमळनेर व एरंडोल येथील दोघांना भंडा:यात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर लगA करून मुलीवर अत्याचार करणारे कथीत पतीदेखील गजाआड झाले आहेत.
ठळक मुद्दे पैसे घेऊन मुलीचे वारंवार लगA लावणा:या महिला आणि पुरूषाचा भंडाफोडदिल्ली, राजस्थानमधील पुरूषांशीदेखील लावले लगAअत्याचाराचा कळस झाल्याने मुलीची पोलिसात तक्रार