शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कॉफीत गुंगीचे औषध टाकून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:46 PM

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर अत्याचार

जळगाव : कॉफीत गुंगीचे औषध टाकून एका ३५ वर्षीय महिलेवर जामनेरच्या भोंदूबाबाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबाने अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला व तो व्हायरल करण्याची धमकी देत औरंगाबाद, दिल्ली, बीड, इंदूर, मुंबई येथील हॉटेल व जळगावात वर्षभर अत्याचार केला. पीडितेने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून आपबिती कथन केली. किशोर सटवाजी जोशी (शास्त्री) रा.शिक्षक कॉलनी, जामनेर असे भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितचे पती बीड येथे नोकरीला आहेत. दोघांमध्ये वादविवाद आहेत. त्यामुळे पीडिता वर्षभरापासून शहरात राहत असून सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करीत आहे. पीडिता व पतीत कौंटुबिक वाद असल्याने जामनेर येथील करणी सेना तालुकाध्यक्ष रतन परदेशी यांनी किशोर जोशी याच्याबाबत माहिती देवून तो पूजा करुन कौटुंबिक वादातून सुटका मिळवून देतो असे सांगून त्याच्याशी ओळख करुन दिली. त्यामुळे पीडिता जोशी याला जळगावात भेटण्यासाठी आली असता २०१८ वर्ष आपल्यासाठी चांगले नाही २०१९ वर्ष चांगले राहिल, त्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून १ जानेवारी २०१९ रोजी औरंगाबाद येथील हॉटेल अतिथी येथे बोलावून घेतले. तेथे दोन तास पूजा केली. त्यानंतर जोशी याने पीडितेला कॉफी दिली. कॉफी पिल्यानंतर पीडितेला गुंगी आली. पहाटे तीन वाजता जाग आली असता जोशी याने अत्याचार केल्याचे जाणवले. याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने व्हिडीओ क्लीप दाखविली. हे पाहून घाबरलेल्या पीडितेने आरडाओरड केली, मात्र त्याने हा प्रकार कोणाला सांगितला तर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तीन दिवस हॉटेललाच थांबवून घेत तेथे शारीरीक संबंध प्रस्थापित केले.पतीपासून वेगळे राहण्यास भाग पाडलेया घटनेनंतर ४ जानेवारी २०१९ रोजी पीडिता बीड येथे घरी गेली. त्यानंतर पंधरा दिवसांनी जोशी याने पीडिताला परत फोन करुन पतीपासून वेगळे रहा, अन्यथा पतीला ही क्लीप दाखवेल म्हणून धमकावले. त्यामुळे पीडितेने बीडमध्ये भाड्याने घर घेतले. तेथेही जोशी याने परत क्लिप दाखविण्याची व मुलांना मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर मुंबई, दिल्ली, बीड, इंदूर व भिलवाडा (राजस्थान) येथील हॉटेलमध्ये सातत्याने अत्याचार केले.पोटात लाथाबुक्यांनी केली मारहाण२८ डिसेंबर २०१९ रोजी मुलगा सुमीत जोशीच्या न्यायालयीत कामासाठी जळगावात बोलावून घेतले. तेव्हापासून पीडिता जळगावातच वास्तव्याला आहे. ९ मार्च २०१० रोजी किशोर जोशी याने दत्तक घेतलेली मुलगा मेघना जोशी हिच्याशी फोनवर बोलल्याचा राग आल्याच्या कारणावरुन रात्री ११ वाजता पीडितेला पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत पोलिसात तक्रार करते, असे सांगितले असता परत जोशी याने त्याच क्लिपचा आधार घेऊन धमकावले. त्रास असह्य झाल्याने पीडितेने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना घटनाक्रम सांगितला. मानव संसाधन विभागाच्या सहायक निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेचा जबाब नोंदविला. त्यानंतर किशोर जोशी याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Jalgaonजळगाव