जळगाव : सुप्रिम कॉलनीत बनावट दारू विक्री करणाऱ्या सोनम बलवीर कंजर (३०,रा.सुप्रिम कॉलनी) या महिलेला गुरुवारी एलसीबीच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिम कॉलनीत सोनम कंजर ही महिला स्पिरीट या रसायनाद्वारे बनविलेली दारू विक्री करीत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी एलसीबीच्या पथकाने सुप्रिम कॉलनीतील बनावट दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली. त्याठिकाणी सोनम कंजर ही महिला बनावट दारू विक्री करताना आढळून आली. तिच्यावर पोलिसांनी कारवाई करीत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, सुनील दामोदरे, शरद भालेराव, ललिता सोनवणे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, भगवान पाटील, भारत पाटील आदींनी केली आहे.