चोपडा : विनातिकीट प्रवास करणा:या चुंचाळे येथील एका तोतया पत्रकाराने महिला वाहकाच्या कानशिलात लगावल्याने चोपडा आगारात महामंडळाच्या कर्मचा:यांनी त्याची धुलाई केली. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.जळगाव-शिरपूर बस (क्र. 9824) मध्ये विनातिकीट प्रवास करणा:या महाजन नावाच्या प्रवाशाकडे महिला वाहक मोरे यांनी तिकिटाचे पैसे मागितले असता मी महामंडळाचा कर्मचारी असल्याचे त्याने सांगितले. इतर प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर महिला वाहकाने त्याच्याकडे ओळखपत्र मागितले असता, त्याने दिले नाही. त्यानंतर मी पत्रकार असल्याचे सांगितले. यावरून वाहक व महाजन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान त्याने वाहकाच्या कानशिलात लगावली. चालक प्रकाश सत्यसा यांनी चोपडा स्थानकात बस आणल्यानंतर कर्मचा:यांना घडलेला प्रकार समजला. या कर्मचा:यांनी व प्रवाशांनी त्याला यथेच्छ मार दिला. स्थानकातील पोलीस कर्मचारी गिते यांनी त्यास शहर पोलीस स्टेशनला नेले. त्यापाठोपाठ महिला वाहक आणि चालक यांनी फिर्याद देण्यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी हा गुन्हा धरणगाव हद्दीत घडला असल्याने ङिारो नंबरने तिकडे वर्ग केला जाईल असे सांगितले. शेवटी पोलिसांनी त्यास दम देत सोडून दिले. मात्र चुंचाळे येथील अनेक व्यक्ती गुन्हा दाखल करावा यासाठी शहर पोलीस स्टेशनमध्ये आले होते. सदर महिला वाहक मंगळवारी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे समजले आहे. (वार्ताहर)
महिला वाहकाला मारहाण
By admin | Published: January 17, 2017 12:57 AM