ऑनलाइन लोकमत
पातोंडा (ता. अमळनेर), दि.12- येथील प्रमिला मालजी पाटील (55) या महिलेचा स्वाइन फ्लू ने मृत्यू झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
गेल्या सात दिवसांपासून या महिलेवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना 10 दिवसांपूर्वी श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. चोपडा येथील डॉ शरद पाटील यांच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांना स्वाइन फ्लूचे लक्षण जाणवत असल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. औरंगाबाद येथे त्यांच्यावर आवठडाभरापासून उपचार सुरु होते. तपासणी अहवालात त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले
उपचारा दरम्यान, बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी पातोंडा आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय अधिका:यांना गावात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. ज्या रुग्णांना सर्दी, ताप असेल त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीला लेखी आदेश देऊन गावातील साफसफाई करण्यासंदर्भात सूचना दिली आहे.
पातोंडा येथील प्रमिलाबाई पाटील यांचा स्वाईन फ्ल्यू मुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यांना स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे जाणवत असल्याने औरंगाबाद येथे दाखल केले होते. त्या अनुशंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांना सुचना केल्या आहेत.
डॉ.दिलीप पाटोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव.