भुसावळ : शहराजवळील कंडारी येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज बिल थकल्याने खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्यासाठी गावातील महिलांनी बुधवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान दरम्यान, मोर्चाद्वारे ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली.दोन दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. आज बुधवारी शंभर महिलांचा सहभाग असलेला मोर्चा ग्रा.पं.कार्यालयावर नेण्यात आला. सरपंच योगिता संदीप शिंगणारे यांनी मोर्चाबाबत सांगितले की, पाण्यासाठी महिलांनी ग्रा. पं. कार्यालयावर मोर्चा आणला होता. ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन सर्व उपाययोजना करीत आहे. प्रथम गावात असलेले सुमारे वीसपेक्षाही जास्त हॅण्डपंप तातडीने सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या शिवाय गावातील पाणी प्रश्न अधिक गंभीर होऊ नये म्हणून पाण्याच्या टँकरचा वापर करून पाणी प्रश्नाची तीव्रता कमी करण्यावर भर आहे, असे योगिता शिंगारे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)१८ हजार लोकसंख्येचे गाव...४भुसावळला लागूनच असलेल्या आणि रेल्वे कॉलनी लगतच्या कंडारी या गावाची लोकसंख्या सुमारे १८ हजारांपेक्षा जास्त आहे. यात कंडारी प्लॉटचा भाग आहे.या ठिकाणी बहुतांश रेल्वे कर्मचाºयांचे वास्तव्य आहे. सहा प्रभाग असलेला या गावाचा वीजपुरवठा वीज बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. विशेष करून महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रेल्वे क्वॉर्टर व कार्यालयातून पाणी आणावे लागत असल्याची स्थिती आहे.पाण्यासाठी टॅँकर४ वीज बिल थकल्याने शहराजवळील कंडारी येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. कंडारीचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. कंडारी गाव तापी नदीच्या काठावर आहे.तरीदेखील येथे दरवर्षी पाणी प्रश्न पेटतो.या वेळी मात्र ग्रा.पं.ने उपाययोजना केली आहे. ग्रामस्थांना पाण्याची अडचण येऊ नये म्हणून टँकरची व्यवस्था केली जात आहे,असे सरपंच योगिता शिंगारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून गावातील सर्व हॅण्डपंप सुरू करण्यात आले आहेत. शिवाय काही ठिकाणी टँकरचादेखील वापर केला जाणार आहे.निमुळत्या गल्लींमध्ये टँकर नेता येणार नाही.ते रस्त्यावर थांबविले जाईल. ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी उपाययोजना करण्यावर प्रशानाचा भर आहे. घाबरण्याचे कारण नाही.- योगिता संदीप शिंगारे, सरपंच, कंडारी, ता.भुसावळ.
पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक
By admin | Published: March 23, 2017 12:37 AM