हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने महिलांना स्वयंरोजगार देणाºया योजनेचा फज्जा उडावला आहे. यंदा पासून ही योजना जवळपास बंद पाडली आहे. यामुळे गरजू महिलांसाठी एकप्रकारे अन्यायकारक निर्णय घेतला गेला असून याविरोधात ओरड होवूनही दखल न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या योजनेत शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना शिलाईमशीनचे वाटप केले जात होते. गेल्या वर्षी या योजनेत ३५० महिलांना यासाठी प्रति लाभार्थीस ८५०० रुपये देण्यात आले. ९० टक्के रक्कम ही अनुदान म्हणून दिली जाते तर १० टक्के रक्कम स्वत: लाभार्थीस टाकावी लागते. या अनुदानातून शिलाईमशीन खरेदी करुन संबंधित महिला ही आपल्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार निर्माण करु शकेल, या हेतूने ही योजना सुरु केली होती.सर्वसाधारण सभेतही गाजला प्रश्नशिवसेनेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांनी सर्वसाधारण सभेतही हा प्रश्न मांडला. मात्र त्यावेळीही केवळ आश्वासन देण्यात आले मात्र प्रत्यक्षात या योजनेसाठी यंदा एकाही रुपयाची तरतूद केलेली नाही.फायदा लाटण्याचा प्रयत्न ?या योजनेचे पैसे प्रोटीन आहार, गोळ्या आदी योजनेत वळवून खरेदीत पैसे कमविण्याचा हेतू तर नाही ना? असा संशयही याबाबतीत व्यक्त केला जात आहे.हा संशय व्यक्त करण्यामागचे कारण असे की, शिलाई मशीन वाटप योजनेत लाभार्थीला रोख पैसे द्यावे लागत असल्याने पैसे मध्ये कोणास खिशात टाकणे शक्य होत नव्हते. याउलट स्वत: खरेदी किंवा ठेका पद्धतीच्या योजनेत‘गोलमाल’ करण्यास सहज संधी असते. यामुळेच ही योजना बंद पाडल्याचाही आरोप होवू लागला आहे.१५ वर्षांपासून योजना केली बंदही योजना गेल्या १५ वर्षांपासून सुरु होती. दरवर्षी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत असतानाही योजनेस प्रतिसाद नसतो, असे कारण महिला व बालविकास विभागाने पुढे करुन योजना बंद पाडली. दरम्यान गेल्या वर्षी १५०० प्रस्ताव आले होते. तर ३० लाख रुपये निधी योजनेसाठी होता.बदल करण्याचे कारण काय ?एकाही सदस्याचा या योजनेल विरोध नाही. उलटपक्षी ही योजना व्यवस्थितपणे राबविण्यात यावी, अशी सदस्यांची मागणी असताना ही योजना अशा प्रकारे मोठा बदल करुन तिचा फज्जा उडविण्याचे कारण काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे. ही अधिकाºयांची मनमानीच असल्याचा आरोपही नानाभाऊ महाजन यांचा आहे.केवळ अपंग महिलांना शिलाई मशीन मिळणारशिलाई मशीन वाटपाची योजना ही इतर महिलांसाठी बंद करण्यात आली असून केवळ अपंग महिलांना यंदा लाभ दिला जाणार आहे. याचबरोबर ३५० ऐवजी सुमारे ६५ महिलांनाच यंदा लाभ दिला मिळेल. यंदा कमी अनुदान मिळाल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी दिली.शिलाई मशीन वाटप योजनेत केवळ अपंग महिलांना संधी देवू वाटप संख्या अल्प केली असेल तर अन्य महिलांव अन्याय होईल, यामुळे ही योजना पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी.-नानाभाऊ महाजन, जि.प. सदस्य
महिलांना स्वयंरोजगार देणाऱ्या योजनेचा जळगाव जिल्ह्यात फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:17 PM
जि.प. च्या महिला ब बालविकास विभागाची मनमानी
ठळक मुद्देलाभ बंद सर्वसाधारण सभेतही गाजला प्रश्न