शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

न्यूनगंड बाजूला ठेवून महिलांनी प्रशासनात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:57 AM

-निता कायटे

महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अन्यायग्रस्त व पीडित महिला निकोचपणे म्हणणे मांडतात..त्यामुळे त्यांच्या मनाची अवस्था व बेतलेल्या प्रसंगाची जाणीव होते आणि त्यातूनच अशा महिलांना न्याय देता येते...महिला अधिकारी म्हणून यापेक्षा कोणता मोठा आनंद असू शकत नाही..असे स्पष्ट मत सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केले.निता कायटे या मुळच्या सिल्लोड, जि.औरंगाबाद येथील रहिवाशी आहेत. औरंगाबाद विद्यापीठातून त्यांनी एम.एससी आॅरगेनिक केमिस्ट्रीची पदवी घेतली. त्यानंतर महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. २०१० मध्ये उपनिरीक्षक म्हणून त्यांची पोलीस दलात निवड झाली. जळगाव व भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला काम केल्यानंतर पदोन्नतीने त्यांची जळगावला बदली झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर आता सध्या स्थानिक गुन्हे शाखेत सहायक निरीक्षक व महिला सहाय्य कक्षाच्या प्रमुख म्हणून त्या जबाबदारी पार पाडत आहेत. सिल्लोड येथे घरी असताना शेजारीच प्रांताधिकारी वर्षा ठाकूर या वास्तव्याला होत्या. त्यांना दररोज घरी घ्यायला व सोडायला लाल दिव्याचे सरकारी वाहन येत होते. एक महिला असूनही त्यांचा रुबाब किती होता..हे मी पाहिल..त्यामुळे आपणही मेहनत घेतली तर असे लाल दिव्याचे वाहन मिळू शकते असा निश्चिय केला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. लाल दिव्याचे वाहन मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले, मात्र ते वाहन घरी घेऊन जाता येते. मुळ रहिवाशी असलेल्या गावी नियुक्ती मिळत नाही.सण,उत्सव नशिबात नाहीपोलीस खात्यात असल्याने सण, उत्सव हे कधीच कुटुंबासोबत साजरा करता आले नाहीत. दोन दिवसापूर्वी पतीचा वाढदिवस होता. रात्री साजरा करण्याचे नियोजन केले.मात्र अचानक आॅपरेशन आॅल आऊटचा वायरलेस संदेश आला आणि सर्व कामे सोडून ड्युटीवर जावे लागले..महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ किंवा सहकारी यांच्याकडून कधीही त्रास झाला नाही..उलट मदतच मिळाली. आपण महिला असल्याने तक्रारदार महिला आवर्जून जवळ येवून त्यांच्या व्यथा मनमोकळ्यापणाने मांडतात..त्या पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांजवळ मांडता येत नाही. त्यामुळे भावी पीढीतील तरुणींनी पोलीस दलात निंकोचपणे यावे...कोणताही न्यूनगंड ठेवू नये..पोलीस म्हणून आपण एखाद्याला कायद्याची जाणीव करुन देतो..तेव्हा लोक विश्वास ठेवतात..महिलांना न्याय देण्याची व त्यांचे मनोबल उंचावण्याची एक ताकद निर्माण होते.-निता कायटे,सहा. पोलीस निरीक्षक