आज समाजात महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रचंड संधी आहेत. उत्पादीत मालाला बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सचोटीने उद्योग क्षेत्रात पुढे आले पाहिजे, असे मत छबी इलेक्ट्रीक प्रा.लि. च्या संचालिका सुप्रिया छबीराज राणे यांनी व्यक्त केले.सुप्रिया राणे या उद्योजक मधुसूदन ओंकार राणे यांच्या सून तर छबिराज राणे यांच्या पत्नी आहेत. सासऱ्यांकडून पतीला उद्योगाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर १९९० मध्ये छबी इलेक्ट्रीकल्स प्रा.लि. च्या संचालकपदी नियुक्ती झाली. पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार सुप्रिया यांनी केला आणि त्या त्यात यशस्वीही ठरल्या आहे. छबी इलेक्ट्रीकल्स ही देशातील डीसी सिस्टीम्स निर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीला आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त असून देशातील एकूण डी.सी.सिस्टीमच्या ३० टक्के गरज छबी इलेक्ट्रीकल पूर्ण करीत असल्याचे सुप्रिया राणे म्हणाल्या.सुप्रिया राणे म्हणतात, उद्योग क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर सचोटी व गुणवत्तापूर्ण उत्पादन किमान किमतीत उत्पादन करणे आवश्यक आहे.जगात उद्यमशिलता, सचोटी, गुणवत्ता आणि विनम्रता यांचे स्थान यांचे स्थान अबाधित आहे. त्या गुणांच्या जोरावर यश आणि कीर्ती मिळू शकते. म्हणून महिलांनी ध्येय निश्चित करुन वाटचाल करावी. आपण सुरु केलेला उद्योग,व्यवसायात कामगारांकडून काम करुन घेण्यासाठी आत्मियता वाढविणारे तंत्र, प्रसंगी, स्वत: काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. उद्योगात यशस्वी होण्याच पतींचे खूप मोठे योगदान असल्याचे त्या सांगतात.-सुप्रिया राणेउद्योजिका.
महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:05 PM