चंद्रशेखर जोशीजळगाव : घरात ‘होममिनिस्टर’ म्हणून ओळख असलेल्या महिलांचा मतदानात मोठा वाटा असतो. गत चार पंचवार्षिक निवडणुकांचा विचार करता महिलांचे मतदान हे ५० टक्क्यांच्या जवळपास असल्याचे लक्षात येते.मतदानाचा हक्क महिलांनाही देण्यात भारत देश हा पुढेच आहे. या बरोबरच पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही स्थान असावे म्हणून ५० टक्के वाटा प्रत्येक क्षेत्रात महिलांचा हा असतोच असतो. त्या तुलनेत महिला वर्गाचे मतदान असते. निर्णायक असेच हे मतदान असल्यामुळे राजकीय पक्ष देखील महिलांना प्रचारात पुढे करतो. त्यांना राजकीय पदेही दिली जातात. अगदी ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग हा असतोच.85 टक्के मतदान हे १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महिलांचे होते. त्यावर्षी एकूण मतदान जवळपास 92 टक्के होते.37 टक्के मतदान हे २००९ मध्ये महिलांचे होते. यावर्षी एकूण मतदानही कमीच झाले होते. त्यावर्षी 42.36 टक्के मतदान झाले होते.55.21 टक्के महिलांचे मतदान हे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदार संघात होते. यावर्षी सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. ते लक्षणिय असेच होते. महिलांमध्ये विशेष उत्साह दिसत होता.
Lok Sabha Election 2019 : महिला मतदार ठरणार उमेदवारांसाठी महत्त्वाच्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:28 PM