चोपडा, जि.जळगाव : दारूमुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी संघर्षाची मशाल पेटविली असून एक दुसºयाला साथ देत गावातून दारू हद्दपार करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले.दारूबंदीसाठी विटनेर, ता.चोपडा येथील महिला एकवटल्या. ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक देत प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप आराक यांना निवेदन दिले. महिलांनी दारुबंदीचा विषय त्यांच्यासमोर मांडला. गावात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कुटुंबांमध्ये दररोज भांडण-तंटे होतात. अनेक मद्यपी पुरुष कुटुंबातील महिलांना मारहाण करतात. यातूनच गावात असंतोष पसरत चालला आहे. अशा परिस्थितीत गावातील अवैध मद्य विक्री थांबली पाहिजे. दारू विक्री करणारे सर्व अड्डे बंद झाले पाहिजेत.यावेळी महिलांनी आपले गाºहाणे संदीप आराक यांच्याकडे मांडतांना सांगितले की, गावातील युवक व्यसनाधीनतेकडे वळले होते. याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. गावात अवैधरित्या विकल्या जाणाºया दारूला पोलिसांचे अभय असल्याचा आरोपही या महिलांनी केला.निवेदनावर निर्मलाबाई गुलाब कोळी, प्रियंका आनंद खैरनार, ज्योतीबाई अंबादास कोळी, योगीता सुरेश कोळी, सुनंदा युवराज कोळी, मंगलाबाई हिंमत रायसिंग, अरुणा कोळी, हिरुबाई कैलास कोळी, ज्योती प्रवीण रायसिंग, अनिता समाधान कोळी, सुनंदा पुनमचंद रायसिंग, ज्योती हिरालाल कोळी, खटूबाई लीलाचंद कोळी, शीतल ज्ञानेश्वर कोळी, संगीता संभाजी कोळी, रेखाबाई प्रल्हाद रायसिंग, तुळसाबाई कोळी या महिलांच्या सह्या आहेत.
दारूबंदीसाठी विटनेर येथील महिला एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 9:54 PM
दारूमुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी संघर्षाची मशाल पेटविली असून एक दुसºयाला साथ देत गावातून दारू हद्दपार करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले.
ठळक मुद्देसंतप्त रणरागिणींनी दारू विक्रेत्यांवर राग व्यक्त करत दिले निवेदनगावात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेअनेक मद्यपी पुरुष कुटुंबातील महिलांना करतात मारहाण अशा परिस्थितीत गावातील अवैध मद्य विक्री थांबली पाहिजे