जळगाव : कोरोनाबाबत दक्षता म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून असल्याने महिला दिनानिमित्त होणारा प्रशासकीय मुख्य कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़यंदा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचा स्वतंत्र कार्यक्रम न ठेवता सर्व कार्यक्रम एकत्रितरित्या कांताई सभागृहात आयोजित करण्यात आले होते़ मात्र, कोरोनाबाबत आलेल्या सूचनांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़जिल्हाधिकारी यांनी दिल्या सूचनाआजाराची व्याप्ती वाढू नये म्हणून सर्व गर्दीच्या कार्यक्रमास प्रतिबंध घालण्यास शासनाचे तोंडी आदेश आले आहे़आयोजकांनी जिल्ह्यात यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदांमध्ये गर्दीचे कार्यक्रम, शाळा महाविद्यालयातील स्रेहसंमलन, प्रदर्शने, होळी व अन्य धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक उत्सक टाळावेत व या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी केले आहे़मास्कसाठी लागेल परवानगीडॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्री करता येणार नाही, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने काढले आहे़मात्र, अद्याप जळगाव स्थानिक पातळीवर तशा सूचना किंवा तसे अधिकृत पत्र शासकीय रूग्णालय किंवा आरोग्य यंत्रणेला मिळाले नसल्याचे वृत्त आहे़सोशल मीडियातून जनजागृतीपर संदेशआरोग्य क्षेत्रातील विविध संघटनांनी कोरोना या व्हायरस बाबतीत जनजागृतीत पुढाकार घेतला आहे़ त्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनने एका व्हिडिओच्या माध्यमातून हा विषाणू याची लागण कशी होते, समज, गैरसमज यावर प्रकाश टाकला आह़े ही क्लिप अनेक गृपवर शनिवारी व्हायरल होत होती़ यासह विविध संदेश विविध गृपवर दिवसभर फिरत आहे़ अफवांपेक्षा जनजागृतीवर अधिक भर असल्याचे या संदेशामधून समोर येत असल्याचे चित्र आहे़काळजी घेण्यास सुरूवातअनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क वापरायला सुरूवात केली असून शनिवारी अनेक शाळांमध्ये मास्क घातलेले विद्यार्थी आढळले होते़ विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षांच्या चालकांनी रिक्षांमध्ये शक्यतोवर सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रतिचे मास्क वापरावे व आपल्या पाल्यांना असे मास्क द्यावे, असे आवाहन पालकांना केल्याचे चित्र आहे़कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना आहेत़ अशा स्थितीत जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यासाठीही परवागनी घ्यावी लागणार आहे़ येत्या काही दिवसात कोरोनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येईल़ सध्या मास्कसंदर्भात डॉक्टरांच्या परवानगीबाबत पत्र आम्हाला आलेले नाही, त्यामुळे तशा काही सूचना स्थानिक पातळीवर आम्ही दिलेल्या नाहीत -डॉ़ ए. पी. कासोटे, प्रभारी अधिष्ठाता.
कोरोनामुळे महिला दिनाचे कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:05 PM