शंकरराव नगरातून वाळू, खडी, विटा भरलेले मोठमोठे ट्रक, डंपर, ट्रॅक्टर यांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषण यामुळे नागरिक वैतागले आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर शनिवारी या भागातील महिलाच रस्त्यावर उतरल्या. रस्त्यावर दगड आडवे लावत व हातात काठ्या घेत या महिलांनी या अवजड वाहनांचा रस्ताच अडविला. तसेच शहर वाहतूक पोलिसांना निवेदनही देण्यात आले. त्यात या रहिवासी भागातून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर रूपाली पाटील, लिना भोळे, प्रगती येवले, वैशाली पाटील, जयश्री महाजन, स्नेहल महाजन, गायत्री साळुंखे, ज्योती मांडेवाल, लतिका खंगार, चारूलता चौधरी, ज्योती नारखेडे, ज्योती शिंदे, सुनिता अटवाल, विनिता दुबे, दीपाली बोंढे, भारती चौधरी,सुषमा दुबे, प्रतीक्षा पाटील आदींच्या सह्या आहेत.
अवजड वाहतुकीविरोधात महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:15 AM