ऑनलाईन लोकमत
वरखेडी, ता.पाचोरा,दि.29- रोहित्र जळाल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून वरखेडी खुर्द गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढला. संध्याकाळर्पयत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
वरखेडी खुर्द गावाला वीज पुरवठा करणारे रोहित्र तीन ते चार दिवसांपासून जळाले आहे. गावातील वीज पुरवठा खंडीत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रा.पं.सदस्य दीपक बागुल, धनराज पाटील यांनी पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही वीज कंपनीच्या अधिका:यांनी दाद दिली नाही. त्यामुळे महिलांनी वरखेडी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी कार्यालयात कनिष्ठ अभियंता अमित चव्हाण हे हजर नसल्याने कार्यालयातील अन्य कर्मचा:यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क करीत बोलणे करून दिले. त्यांनी मोर्चेकरी महिलांशी मोबाईल वर संवाद साधून आज सायंकाळ र्पयत नवीन रोहित्र बसवणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य दीपक बागुल, सागर धनराळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राकेश पाटील, धनराज पाटील, विजय भोई, डॉ.जितेंद्र चौधरी, प्रकाश वनारसे, सांडू पाटील आदी ग्रामस्थ देखील होते.