फैजपूर, ता़यावल,दि.8- शहरातील भुसावळरोडवरील गणेश कॉलनी भागात पाणी प्रश्न गंभीर बनल्याने व इतर नागरी सुविधा मिळण्यासाठी महिलांनी सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हंडा मोर्चा आणत धडक दिली़
रणरणत्या उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला़ मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचण्यात आला़ नागरी सुविधा मिळण्यासाठी आग्रही भूमिका मांडण्यात आली़ प्रसंगी या भागातील नगरसेवक तसेच नागरिक उपस्थित होत़े