जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे एम.आय.डी.सी.तील श्रद्धा पॉलिमॅटस येथे १९ ते ५० वर्षे वयोगटातील ४० महिला कामगारांसाठी मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य या विषयावर संवाद साधण्यात आला. महिलांच्या शंकांचे, समस्यांचे निरसन करण्यात आले. तसेच सॅनिटरी पॅडसचे वितरण करण्यात आले.
यावेळी रोटरी सेंट्रलच्या सदस्या डॉ. विद्या चौधरी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजी नायर यांनी केले. यावेळी अध्यक्ष प्रा.डॉ. अपर्णा भट-कासार, डॉ. प्रीती पाटील, ज्योत्स्ना महेंद्र रायसोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
==============
३० मुलांना पोषक आहार वितरण
जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्त ३० मुलांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ जयंत जहागीरदार, डिस्ट्रिक सहसचिव डॉ.तुषार फिरके, दिलीप जैन, स्वाती ढाके, मनीषा बागुल उपस्थित होते.