धुळे : महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दलातर्फे शहरात महिला बीट मार्शल योजना सुरू करण्यात आली आह़े त्यासाठी तीन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या असून सहा महिला पोलीस कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आह़े शाळा व महाविद्यालय परिसरात गस्तीवर अधिक भर देण्यात येणार आह़े शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट मार्शल योजना सुरू आह़े त्यावर पोलीस कर्मचारी गस्त घालीत असतात़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी बीट मार्शल पोहचतात़ त्यामुळे अनर्थ टळतो़ या पाश्र्वभूमीवर ज्या ठिकाणी महिलांची अधिक वर्दळ असते, अशा ठिकाणी त्यात शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांकडून छेडखानीच्या घटना घडतात़ या सातत्याने घडणा:या घटनांमुळे महिलांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असत़े तर शहरातील कॉलनी परिसर देखील आता सुरक्षित राहिलेले नाहीत़ बहुतांश कॉलनी परिसरात टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागतो़ शाळा व महाविद्यालयात जाणा:या येणा:या विद्यार्थिनींची छेड काढली जात़े या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी स्वतंत्र महिलांचे बीट मार्शल सुरू केले आह़े बीट मार्शलसाठी तीन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ त्यावर प्रत्येकी दोन महिला कर्मचारी शहरात सतत गस्त घालतील़ त्यामुळे महिलांची सुरक्षा होईल़ या योजनेचा शुभारंभ सोमवारपासून करण्यात आला़ या वेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपअधीक्षक देवीदास गवळी, एम़टी़ओ. मंदार कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ, माळी, कार्यालय अधीक्षक श्याम पडगेलवार आदी उपस्थित होत़े
महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता महिला पोलीस बीट मार्शल
By admin | Published: February 29, 2016 11:50 PM