वाकोद, जि. जळगाव : शनिवार संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील पहूर ते वाकोद गाव दरम्यान असलेला नाल्यावरील पूल वाकोद वाहून गेल्याने जळगाव औरंगाबाद महामार्गाची वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली. त्यानंतर रात्री पुन्हा सिमेंट पाईप टाकून व भर टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा रस्ता कच्चाच असल्याने वाहने त्यात फसत आहे.शनिवारी हा पूल वाहून गेल्याने रात्रभर माल वाहतूक वाहने रस्त्यावर अडकून पडल्याने दोन्ही बाजू वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास पाण्याची पातळी ओसरल्याने जेसीबीच्या साह्याने सिमेंट पाईप टाकून व भरती भरून रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी काही प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून सुरु करण्यात आली. मात्र या ठिकाणी वाहने चिखलात फसत असल्याने वेळोवेळी रस्ता दुरुस्त करावा लागत आहे.सतत गेल्या तीन महिन्यापासून सारखा पाऊस सुरु आहे तसेच जळगाव औरंगाबाद महामार्गाची अत्यंत दययनीय अवस्था झाली असताना संबधीत ठेकेदारांनी वाकोद आणि गोसावी वाड़ी दरम्यान बांधलेला दगडी पूलही तोडून ठेवला.
वाकोदनजीकच्या वाहून गेलेल्या पुलाचे कामाला रात्रीपासून सुरुवात, वाहने फसत असल्याने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:55 PM