जळगाव : तरसोद-फागणे टप्प्याचे काम आता गतीने सुरू करण्यात आले असून मुसळी फाट्यापासून पारोळ्यापर्यंतच्या कामाला गती दिली असल्याचा दावा मक्तेदार अॅग्रोव्ह इन्फ्राटेकचे प्रोजेक्ट मॅनेजर कापडणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.ते म्हणाले की, सपाटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी तर डांबरीकरणही सुरू करण्यात आले आहे. ३-४ किमीचे डांबरीकरण पूर्णही झाले आहे.पुलांच्या कामांना त्या तुलनेत वेळ लागणार आहे. छोटे ओढे-नाल्यांवरील पूलांचे (मोऱ्यांचे) काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.तर एरंडोल व पारोळा येथील पुलांच्या कामांना पुढील महिन्यात म्हणजेच एक-दोन आठवड्यातच सुरूवात होईल. गिरणावरील तीन मोठ्या पुलांचे काम सुरू होण्यास मात्र किमान दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लागू शकेल.कारण रेल्वेवरील पुलाला रेल्वेची मंजुरी मिळाली असल्याने आता त्याचे डिझाईन सुरू आहे. तर एक वाहनांसाठीचा पूल हा पूल-कम-बंधारा नसून सध्याच्या पुलासारखाच होणार आहे.गिरणावरील पूलांअभावी गैरसोयगिरणानदीवरील पुलाच्या कामांना सुरूवात होण्यास वेळ लागत असल्याने महामार्गाच्या बायपासचे काम पूर्ण झाले तरी निरूपयोगी ठरणार आहे.रात्री होणार डागडुजी४‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता इच्छादेवी ते अजिंठा चौफुली रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास गुरूवारीच रात्री सुरूवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एरंडोल व पारोळ्याच्या पुलांचे काम पुढील आठवड्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:18 PM