पिलखोड, ता. चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रस्त्याचे काम संथगतीने चालू असल्याने वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे.
दीड वर्षापूर्वी १३५ कोटींच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चाळीसगावफाटा ते दहिवाल पावोत रस्ता तयार झाला आहे. नरडानाफाटा-पिलखोड टाकलीदरम्यान मात्र संथगतीने काम चालू आहे. एक बाजू खोदून झाली असून काही ठिकाणी खडीचे ढिगारे पडून आहेत. तसेच पिलखोडच्या पुलावरील डांबरीकरण पूर्णपणे निघून खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्वीपेक्षाही खराब झाला आहे. पुलावर त्वरित डांबरीकरणाचा थर टाकावा, अशी मागणी होत आहे. चाळीसगाव-मालेगाव या रस्त्याची दयनीय अवस्था होती. खासदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव-मालेगाव रस्ता, येवला-एरंडोल रस्ता व सायगाव-मंदुर्ने गिरणा नदीवरील पूल हे तिन्ही महत्त्वाचे रस्ते मंजूर करून काम सुरू केले आहे. त्यांनी चाळीसगाव-मालेगाव-नांदगाव तालुक्यांतील जनतेचा फार मोठा दुवा घेतला आहे.
===Photopath===
190621\19jal_9_19062021_12.jpg
===Caption===
साकूर फाटा ते पिलखोड दरम्यान पडलेले खडीचे ढिगारे. (छाया : अमोल सोनार)