जळगाव : मनपाने शासनाकडून प्राप्त 10 कोटींच्या निधीतून मोठय़ा प्रमाणावर रस्ते व त्यासोबतच गटारी, स्लॅब कल्व्हर्ट आदी कामे समाविष्ट केली होती. मात्र विभागीय आयुक्तांनी अमृत योजनेची कामे प्रस्तावित असलेल्या रस्त्यांवर त्या कामापूर्वी डांबरीकरणाचे काम न करण्याची सूचना केल्याने अशा रस्त्यांचा शोध घेऊन तेथे आवश्यकता असल्यास गटारीची कामे प्रस्तावित केली जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव बदलून नव्याने मंजुरीची सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे. मनपाने शासनाकडून प्राप्त 10 कोटीच्या निधीतून सुमारे 3 कोटीची रस्त्यांची व उर्वरीत निधीतून गटारी व अन्य कामे प्रस्तावित केली होती. तसेच 3 कोटी 75 लाखांच्या निधीतून रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र विभागीय आयुक्तांनी अमृत योजनेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते खोदले जाणार असल्याने या योजनेत ज्या रस्त्यांचा समावेश असेल, तेथे ही कामे अमृतचे काम झाल्यावरच करावीत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या कामांसाठी निविदा प्रक्रिया करून काही कामांचे कार्यादेशही दिले होते. मात्र आता या प्रस्तावातच बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ही कामे व कार्यादेशही रद्द होण्याची शक्यता आहे.
रस्त्यांऐवजी करणार गटारींची कामे
By admin | Published: January 14, 2017 12:35 AM