शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

चार तास बंद पाडले महामार्ग चौपदरीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 2:44 PM

वरणगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती : नगराध्यक्षांसह नगरसेवक आक्रमक

वरणगाव : शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन महामार्ग चौपदरीकरणात दाबली जावून तिला गळती लागली.त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला.ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी आधी पाईप लाईन दुरुस्त करा आणि मगच महामार्गाचे काम करा,अशी भूमिका घेत येथील नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल चारतास महामार्गाचे काम थांबविले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.पाईप लाईनबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वारंवार सांगूनही उपाय योजना झाली नाही. ही बाब काळे यांना समजताच त्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले.नगराध्यक्ष काळे आक्रमक झाले.त्यांनी सहकार्यांसोबत अंजनसोंडे गाठले आणि महामार्गाचे काम थांबविले. त्यांच्यासोबत साजिद कुरेशी, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, भाजपा शहरप्रमुख सुनील माळी, इरफान पिंजारी, मिलिंद मेढे यांच्यासह आकाश निमकर, भूषण राजपूत, गणेश तळले, गणेश कोळी,संजय माळी, रवी नारखेडे व वरणगावकरांनी महामार्गाचे सुरू असलेले काम चार तास बंद करून रस्ता बंद आंदोलन केले. पालकमंत्री गिरीश महाजन महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांशी फोन वरून पाईपलाईन दाबली आहे ती तत्काळ मोकळी करून त्यासाठी स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले. प्रसंगी नहीचे अधिकारी अरुण सोनवणे यांनी बुजलेली पाईप लाईन संपूर्ण मोकळी केली व पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले प्रसंगी शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.