जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.५३ च्या (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६) शहरातील ८ किमी लांबीच्या चौपदरीकरण कामाचा कंपनीशी करार झाल्यानंतर संबंधित कंपनीने कामाची तयारी सुरू केली असून खोटेनगरपासून त्यासाठी साफसफाई व इतर कामाला सुरुवात झाली आहे. करारानुसार कंपनीला १८ महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे. असे असले तरी एक वर्षात हे काम करण्याचे उद्दीष्ट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले. निविदा निश्चित झाल्यानंतर कंपनीने अनामत रक्कमही (डिपॉझिट) भरली व या कंपनीशी १२ जुलै रोजी करार करण्यात आला.हा करार झाल्यानंतर कंपनीने कामाची तयारी केली असून महामार्गावर खोटे नगरनजीक कामाला सुरुवात झाली आहे. सोबतच आवश्यक साहित्यही आणले जात आहे.वर्षभरात होणार काम पूर्णमहामार्ग प्राधिकरणाने कंपनीशी केलेल्या करारानुसार हे काम १८ महिन्यात पूर्ण करायचे आहे. असे असले तरी अंतर कमी असल्याने हे काम जलदगतीने मार्गी लावत एक वर्षातच पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.उद्या भूमिपूजनमहामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते होणार आहे. याच दिवशी जिल्हा नियोजन विकास समितीची दुपारी १ वाजता गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याने त्या पूर्वी हे भूमीपूजन होणार आहे.
जळगावात महामार्गाच्या कामाला खोटेनगरपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:45 AM