जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम ‘प्लॅन’नुसार म्हणजेच ‘टी’ आकारातच होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. तसेच समांतर रस्त्याचा डीपीआरही मंजूर झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.समांतर रस्ता तसेच महामार्गाची दुरुस्ती आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाचे रखडलेले काम अद्यापही मार्गी लागलेले नाही. हे तिन्ही विषय चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच प्रलंबित आहेत. याबाबत लोकमतने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. चंद्रकांत पाटील हे आज जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रपरिषद घेतली.शिवाजीनगरवासीयांनी पालकमंत्र्यांपुढे जोडले हातपालकमंत्री म्हणाले, शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम मंजूर ‘प्लॅन’नुसारच होईल. हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर लगेच दीपककुमार गुप्ता व शिवाजीनगरवासीयांनी थेट पालकमंत्र्यांपुढे जात त्यांना हात जोडले व शिवाजीनगरवासीयांच्या मागणीनुसार पुलाचे काम करण्याची विनंती केली. मात्र मंजूर ‘प्लॅन’नुसारच म्हणजेच टी आकारातच हे काम होईल, असे पालकमंत्री म्हणाले. त्यावर गुप्ता यांनी सध्या आहे तसाच पूल करावा, अशी मागणी केली, मात्र पालकमंत्र्यांनी त्यास नकार दिला.समांतर रस्ते प्रश्न अधिक बोलणे टाळलेसमांतर रस्त्यांचा प्रश्न कधी मार्गी लागणार असे पालकमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झाला असून या विषयावर अधिक बोलणे टाळले व ते सभागृहाबाहेर पडले.समांतर रस्ते : निविदा काढण्याबाबत आठवडाभरात कार्यवाहीसमांतर रस्त्यांबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने १४४ कोटींच्या डीपीआरनुसार निविदा काढण्याबाबत परवानगी दिली आहे. प्रकल्प संचालक हे निविदा काढण्याबाबत आठवडाभरात कार्यवाही करणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत पत्रकारांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात दिली आहेपाणी कपात करून जुलैपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजनजळगाव शहरास वाघूर धरणातून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. यात पाणी कपात करून जुलै २०१९पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा उल्लेख आहे.)
जळगावातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम ‘टी’ आकारातच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:17 PM