भडगाव ते वाडे रस्त्याची दुर्दशा झाली होती. वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निधीतून या रस्त्याचे काम मंजूर केले आहे. याकामी ६ कोटी ८० लाखांचा निधीही मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाला वाडे गावापासून सुरुवात झाली आहे. यात गावालगत रस्त्यांवर काँक्रिटीकरण व रस्त्याच्या दुतर्फा काँक्रिटीकरण गटारींचे काम करण्यात येणार आहे. इतर रस्त्याच्या भागांमध्ये डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
टेकवाडे बुद्रुक ते वाडे गावाला जोडणाऱ्या नाल्यावरील फर्शी पुलावर काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार असून भडगाव ते वाडे हा रस्ता वापरासाठी सोयीचा ठरणार आहे. शेतकऱ्यांना शेती माल वाहतुकीसाठीही रस्ता मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान मानले जात आहे. या रस्त्याच्या कामाला संबंधित ठेकेदारांनी सुरुवात केली आहे. रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. वाडे गावालगत रस्त्यावर खडीकरणाचे काम झाले आहे. तसेच गिरणा काठ नावरे फाट्यापुढील वळणापर्यंत सध्या काँक्रिटीकरणाच्या कामासही सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे करावे. या रस्त्यावर पावसाचे वा पाइप लाइनचे पाणी नेहमी साचते. रस्त्याचा भाग उंच करून गिरणा नदीकडे रस्त्याचा उतार काढावा. तसेच गिरणा नदीपासून ते उंबरे शेरी रस्त्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा काँक्रिटीकरण गटारींचे बांधकामही करण्यात यावे जेणेकरून रस्त्यावर पाणी न साचता गिरणा नदीकडे पाणी वाहून जाईल. रस्ता खराब होणार आहे. तसेच वाडे, टेकवाडे बुद्रुक गावालगतही रस्त्याच्या कामासह काँक्रिटीकरण गटारींचे रस्त्याच्या कामासोबतच चांगले काम करण्यात यावे. बस स्टँड भागात वळणावरच्या रस्त्याला अडथळा ठरणारा विजेचा पोल हटवावा, अशी मागणी होत आहे.
जि. प. शाळेच्या कंपाऊंडला लागून काँक्रिटीकरणाची गटार न टाकता शाळा कंपाउंडला लागूनच रस्त्याचे खडीकरणाचे झालेले काम दिसत आहे. मग या गावालगत रस्त्याच्या दुतर्फा काँक्रिटीकरणाच्या गटारी होणार की नाहीत? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. संबंधित ठेकेदाराने नियमानुसार तसेच मंजुरीनुसार रस्त्याचे काम करावे, असे म्हटले जात आहे.
190721\19jal_1_19072021_12.jpg
वाडे गावाजवळील वळणार रस्त्याचे सुरु झालेले काम.