लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शहरात लहान-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करणारा परप्रांतीय कामगार वर्ग धास्तावला आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधव गावाकडे परतण्याची तयारी करत असून, दुसरीकडे कामगार वर्ग गावी गेल्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याने उद्योजक धास्तावले असल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
जळगाव शहरात व परिसरातील तालुक्यांमध्ये बांधकाम, विविध उद्योग, हॉटेल व किरकोळ व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३० ते ३५ हजार परप्रांतीय बांधव आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे हे कामगार गावाकडे परतल्यानंतर आता पुन् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने गावाकडे जाण्याची तयारी करत आहेत. लॉकडाऊनमध्ये गेल्या वर्षी सरकारने सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवल्यामुळे खाण्या-पिण्याचे खूप हाल झाले होते. सरकार कोरोनामुळे घरातच राहायला सांगते. मात्र, घरात राहून खाणार काय ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गेल्यावर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घराकडे जाण्यासाठी खूप हाल झाले होते. त्यामुळे आता लॉकडाऊन होणार हे निश्चित असल्याने आतापासूनच आम्ही गोरखपूर येथे परतत असल्याची माहिती शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकांनी 'लोकमत' प्रतिनिधीला दिली.
तर दुसरीकडे एकदा का परप्रांतीय मजूर वर्ग गावाकडे परतल्यावर लवकर येत नाही. त्यामुळे त्यांना याच ठिकाणी थांबवून ठेवण्यासाठी उद्योजकांकडून प्रयत्न सुरू आहेत. मजूर गावाकडे त्याचा कामावरही परिणाम होतो. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनमधून उद्योजकांना वगळण्याची मागणी जळगावातील उद्योजकांकडून उद्योगमंत्र्यांकडे करण्यात येत आहे.
इन्फो :
कामावर कुठे किती
- औद्योगिक वसाहत १०,०००
-हॉटेल व्यवसाय २,०००
-बांधकाम क्षेत्र ५०००
इन्फो :
कामगारांच्या प्रतिक्रिया
-हाताला काम नाही, इथे तरी काय करणार
१) कोरोना काळात गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायसह सर्व उद्योग व व्यवसाय बंद होते. त्यामुळे घरी बसून काय खाणार? हा मोठा प्रश्न पडला होता. आताही लॉकडाऊन केल्यावर तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून आतापासून गावाकडे जात आहे.
साहिल आनंद, बिहार
लॉकडाऊनमध्ये स्थानिक लोकांना जीवन कसेतरी जगता येते. मात्र, आमचा काम धंदा बंद झाल्यावर आम्ही कसे जगणार. या ठिकाणी हाल होण्यापेक्षा गावाला जाणे सोयीचे वाटते. म्हणून आम्ही गावाकडे जात आहोत.
मनोज कुमार, गोरखपूर
लॉकडाऊनमध्ये उद्योग बंद असल्याने हाताला काम नसते. त्यामुळे काही परप्रांतीय बांधव गावाकडे जाण्याचा विचार करतात. तर जे मजूर स्थायिक झालेले असतात, ते गावाला जात नाही. मात्र, सरकारने आता तरी लॉकडाऊन करायला नको.
गणेश यादव, कामगार
कामगार गावी परतला तर
इन्फो :
कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यावर कामगार वर्ग गावी जाण्याचा निर्णय घेतो. परिणामी यामुळे आमच्या उद्योगावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनमधून उद्योगांना वगळायला हवे, यासाठी आमचा उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
सचिन चोरडिया, उद्योजक तथा सचिव (जिंदा)
मुळात गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे उद्योजकांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून, सरकारने दुसऱ्या उपाययोजना करायला हव्या. मजूर वर्ग गावी गेल्यावर त्यांना पुन्हा आणण्यासाठी खूप त्रास होत असतो.
संतोष इंगळे, उद्योजक
लॉकडाऊन लागण्यापूर्वीच माझ्याकडील परप्रांतीय कामगार वर्ग त्यांच्या गावी रवाना झाला आहे. सरकारने लॉकडाऊन लावताना उद्योग-व्यवसायासाठी सवलत द्यायला हवी. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना रात्री किमान १०पर्यंत तरी सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी.
प्रदीप आहुजा, हॉटेल व्यावसायिक
इन्फो :
गेल्या वर्षाची आठवण
यावेळी काही उद्योजकांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर गावी गेलेले परप्रांतीय बांधव दिवाळीनंतर परतले होते. त्यांना कामावर येण्यासाठी अनेकदा विनंती कराव्या लागल्या. कारण, कमी मजुराअभावी उत्पादनावर परिणाम होत असल्याने, नुकसान व्हायचे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी मजुरांची खूप आवश्यकता असते. त्यामुळे यंदाही तसे झाल्यास खूप हाल होतील. आधीच कुशल मनुष्य बळाची कमतरता असल्याने, त्यात हे परप्रांतीय कामगार गावाकडे गेल्यावर याचा उद्योग-व्यवसायावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे कमी मजुरांअभावी गेल्या वर्षी कसे नुकसान झाले, याची आठवण काही उद्योजकांनी करून दिली.