जामनेर, जि.जळगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना चक्क जमिनीवर बसवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे कोविड सेंटर की कार्यकर्ता सभा असा सूर सोशल मिडीयावर सुरु आहे. दरम्यान, रूग्णांना दिलेल्या वागणुकीचा निषेध करण्यात येत असल्याचे निवेदन एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरला नुकतीच भेट दिली. कोविड सेंटरमधील रुग्णांना त्यांनी स्वत: व्यासपीठावरून मार्गदर्शन केले. मात्र या दरम्यान कोविड रुग्णांना मात्र चक्क जमिनीवर बसविण्यात आले. या दरम्यान रुग्णांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करून चार मजली बेडवरून रुग्णांना खाली उतरवून समोर बसविण्यात आले. हा प्रकार सोशल मिडीयावर आता व्हायरल होत आहे.कोविड रूग्णालयात रूग्णांशी संवाद साधून त्यांना धीर देण्यासाठी आपण नेहमीच जामनेर तसेच जळगावच्या कोविड सेंटरला जात असतो. त्या दिवशी एक महिला अधिकारी आले असल्याने पाच मिनिटे आपण गेलो होतो. रूग्णांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य केले नाही. ही मंडळी कामे काही करत नाही पण केवळ टीका करत असते. यांनी एखादा उपक्रम सुरू केल्याचे दाखवावे.- गिरीश महाजन, आमदार जामनेर.
जामनेरला कोविड सेंटर की कार्यकर्ता सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:01 AM
कोविड सेंटरमध्ये कोरोनासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना चक्क जमिनीवर बसवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे कोविड सेंटर की कार्यकर्ता सभा असा सूर सोशल मिडीयावर सुरु आहे.
ठळक मुद्देगिरीश महाजनांवर एनएसयुआयची टीकेची झोडरुग्णांना बसविले चक्क जमिनीवर