शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

कपाशीचे अनुदान मिळविण्यासाठी कसरत

By admin | Published: March 29, 2017 12:32 AM

जामनेर तालुका : लाभासाठी अनेक जाचक अटींचा करावा लागणार सामना

वाकोद, ता. जामनेर : मागील वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आता शासनाकडून १० कोटींचे अनुदान जामनेर तालुक्यातील शेतकºयांसाठी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे़ एक तर उशिरा मिळालेल्या तोकड्या मदतीसाठी शेतकºयांना अनेक अडचणींवर मात करीत हे अनुदान मिळवावे लागणार असल्याची स्थिती आहे़ यासाठी विविध कागदपत्रांसह अनेक जाचक अटी ठेवण्यात आलेल्या आहेत़  यामुळे कमीत कमी शेतकºयांपर्र्यंत हा लाभ पोहोचेल अशी व्यवस्था सरकारने या नियमांमधून केलेली आहे़, असा शेतकºयांचा आरोप आहे.गेल्या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़  ही बाब लक्षात घेऊन शासनाने मागील वर्षी जामनेर तालुक्यात मका, कपाशी या पिकांसाठी नुकसान भरपाई म्हणून अनुदान जाहीर केले होते़  यापैकी मका पिकासाठी सुमारे २१ कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थी शेतकºयांना वाटप केले होते़  शासनाकडून हे अनुदान वेळेवर प्राप्त झाले होते, तरी जिल्हा बँकेच्या काही अडचणींमुळे हे अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात खूपच विलंब लागला होता़ या हंगामातील उर्वरित कपाशी पिकाचे अनुदान गेल्या काही दिवसांपूर्वीच जामनेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे़ यात सुमारे १० कोटी १८ लाख रुपये रक्कम हंगाम २०१५ मधील  दुष्काळी  कपाशी पिकासाठी अर्थसाह्य म्हणून अनुदान मिळाले आहे़ हे अनुदान वाटपासाठी तलाठीवर्गाकडून अनुदान लाभार्र्थींच्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे़  अनेक ठिकाणी याद्यांमध्ये घोळ  वाकोद व परिसरातील गावांसह तालुक्यातील अनेक गावांत शासनाकडून मिळणाºया विविध अनुदानासाठी पात्र लाभार्र्र्थींच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत़  मात्र या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून बºयाच शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व नाव चुकलेले आहे. तसेच अनेक शेतकºयांची तर नावेच याद्यांमध्ये नाहीत, तर काहींची नावे पुन्हा आलेली असतात़  अनेक शेतकºयांचा पीकपेरा सातबारा उताºयावर चुकलेला आहे़  अशा अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना हे अनुदान मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते़  परिणामी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात बराच वेळ यात जात असल्याने अनेक शेतकरी हैराण झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.मागील वर्षाच्या दुष्काळात कपाशी व सोयाबीन अनुदानाची १० कोटींच्या जवळपास रक्कम जामनेर तहसीलला प्राप्त झालेली असून, लवकरात लवकर अचूक याद्या संबंधित तलाठ्यांकडून बनविण्याचे काम सुरू आहे़  त्वरित हे अनुदान लाभार्थी शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.-परमेश्वर कासुळे, नायब तहसीलदार, जामनेरगेल्या अनेक वर्षांपासून मी हरिनगर, ता. जामनेर शिवारात शेतजमीन घेतली. राहायला बाहेरगावी असून, दरवर्षीच्या  याद्यांच्या घोळामुळे मी या अनुदानापासून नेहमी पाठपुरावा करूनही वंचित राहत आहे. -भागचंद पारख, शेतकरी