जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने ह्यभारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे नवीन परिणामह्ण या विषयावर सात दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली.२० ते २७ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेत कोरोना काळात भारताने कोविड डिप्लोमेसीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर गरजू राष्ट्रांना दिलेल्या वैद्यकीय मदतीमुळे निर्माण झालेली प्रतिमा यावरही कार्यशाळेत चर्चा झाली. या चर्चासत्रात डॉ.लियाकत खान, डॉ.विजय खरे, ब्रिगेडीअर हेमंत महाजन, मोहम्मद मुदस्सर कमर, रोहन चौधरी, डॉ.दिलीप मोहिते, डॉ.नंदकिशोर कुमार यांनी आपली मते मांडली. प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी समारोप केला. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ५६० जण सहभागी झाले होते.