कार्यक्रमात इंजिनिअर्स व विद्यार्थी यांनी एकमेकांना प्रश्नोत्तरे करून इंजिनिअर्स यांनी त्यांचे वैयक्तिक जीवन, इंजिनिअर्स लाइफस्टाइल, आयुष्यात कसे पुढे जायचे, हायवे बांधकामांबद्दल माहिती दिली. त्यांच्यासोबत मनोरंजनपर खेळ घेण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे उपस्थित इंजिनिअर्सपैकी बहुतांश इंजिनिअर बाहेरील राज्यातील होते. प्रशासन विभागाचे प्रमुख श्यामलाल यांनी विद्यार्थ्यांना आपल्या चांगल्या भविष्यासाठी घराबाहेर पडावे लागले तरी आणि तुमच्यात स्किल असेल तर तुम्ही कुठे काम करू शकतात. प्रगतीसाठी घर सोडावे लागले तरी घर सोडून बाहेर पडावे असे सांगितले.
संस्थेचे प्राचार्य एस. के. कुरेशी आणि आर. बी. महाजन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी बनवण्यासाठी संस्थेच्या वतीने जे.टी. महाले, एस. एस. कुलकर्णी, के. जे. राणे, व्ही. एन. राणे, एम.आर. नरवाडे, जी. एस.महाजन, पी.पी. चौधरी, एम.पी. कुरकुरे इत्यादी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ-
कार्यशाळेत मार्गदर्शन व मनोरंजन करताना वेल्सपुन ग्रुपचे पदाधिकारी. सोबत इंजिनिअर, कर्मचारी व आयटीआयचे प्राचार्य एस. के. कुरेशी.