जळगाव : असुरक्षित रक्तसंक्रमणामुळे रुग्णांना होणाऱ्या धोकादायक आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रुग्णांनी सुरक्षित रक्ताची मागणी करणे हा अधिकार बनला असून सुरक्षित जीवनासाठी ही बाब आवश्यक असल्याचा संदेश रक्तपेढ्यांच्यावतीने दिला जात आहे. विशेष म्हणजे रक्तदानाविषयी जनजागृती करणे व सुरक्षित रक्तासाठी शहरातील रक्तपेढ्या दक्षता घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्यामुळेच यंदाच्या संकल्पनेनुसार ‘सुरक्षित रक्त मिळून जीवनही सुरक्षित’ असल्याची अनुभुती रुग्णांना आल्याचे सुखद चित्र आहे.‘सुरक्षित रक्त... सुरक्षित जीवन’या वर्षी जागतिक रक्तदाता दिवसाची ‘सेफ ब्लड, सेव्ह लाईफ’ अर्थात ‘सुरक्षित रक्त... सुरक्षित जीवन’ अशी संकल्पना आहे. सुरक्षित व शुध्द रक्त मिळणे हा रुग्णाचा अधिकार आहे. त्यासाठी रुग्णांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासलेले रक्तच स्वीकारण्याचा आग्रह केल्यास वेगवेगळ््या आजारांवर मात करणे शक्य होऊ शकते. या शुद्ध व सुरक्षित रक्तासाठी नॅट तंत्रज्ञानाचा वापर जळगावात सुरू झाला व सुरक्षिततेची भावनाही रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.सुरक्षित जीवनासाठी सुरक्षित रक्त आवश्यकअसुरक्षित रक्त संक्रमणामुळे पसरणाºया एड्स, हिपॅटायटिस या सारख्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित रक्त स्वीकारणे सुरक्षित जीवनासाठी आवश्यक आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारी पहाता असुरक्षित रक्त संक्रमणामुळे धोकादायक आजारांचा प्रादुर्भाव रुग्णांना झाला आहे. ही आकडेवारी पहाता रूग्णांनी सुरक्षित रक्ताची मागणी करणे हे सुरक्षित जीवनासाठी आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जनजागृती करणे हे जागतिक रक्तदाता दिवसाचे उद्दिष्ट मानले जात आहे.जळगावात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीमध्ये नॅट तंत्रज्ञानाद्वारे आतापर्यंत एकूण ४४०६ पिशव्यांची नॅट चाचणी व सुरक्षित नॅट रक्तसंक्रमणाच्या ५३५३ पिशव्यांची चाचणी करण्यात आले आहे. रेडक्रॉसचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, सहसचिव राजेश यावलकर, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तपेढी सचिव अनिल कांकरीया व कार्यकारिणीचे सर्व सदस्य हे रुग्णांना सुरक्षित व शुध्द रक्त पुरविण्यासाठी कार्यरत आहेत.कोरोनाच्या संकटात रक्तदानासाठी पुढे याकोरोनाच्या संसर्गाची भीती असल्याने रक्तदात्यांचे रक्तपेढीत येणे व शिबिराचे आयोजन करणे कमी झाले आहे. त्यातच कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपट्याने वाढ होत आहे. त्यांना लागणारे रक्त व थॅलेसेमिया, कॅन्सरचे रुग्ण यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या नियमांनुसार व आवश्यकतेनुसार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. नियमांचे पालन करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले आहे. १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन तसेच माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे या दिनी रक्तदानाविषयी विविध संदेश दिले जात आहे.सुरक्षित व शुध्द रक्त मिळणे हा रुग्णाचा अधिकार आहे. त्यासाठी रुग्णांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासलेले रक्तच स्वीकारण्याचा आग्रह केल्यास वेगवेगळ््या आजारांवर मात करणे शक्य होऊ शकते. या शुद्ध व सुरक्षित रक्तासाठी नॅट तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तपेढी चेअरमन, इंडियन रेडक्रॉस सोसायटीरक्तदात्यांनी कोरोना संसर्गाची भीती न बाळगता रक्तदान करावे. आपल्या १५ मिनिटांच्या रक्तदानाने तीन लोकांचा जीव वाचू शकतो. एकाच रक्त पिशवीतून प्लेटलेट्स, प्लास्मा व लालपेशी वेगळे करता येते. त्यामळे किती लोकांचे जीव वाचवू शकतो ही जाणीव ठेवून रक्तदानाचा संकल्प करा.- डॉ.सई नेमाडे, संचालिका माधव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी.
जागतिक रक्तदाता दिन विशेष : सुरक्षित रक्ताने सुरक्षित जीवनाची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:24 PM