जळगाव : महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवार २१ डिसेंबर रोजी सकाळी सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने व १२० जणांच्या टीमच्या मदतीने ६ तासात ३ हजार किलो वांग्यांचे भरीत तयार करण्याचा विश्वविक्रम केला. त्यासोबतच खान्देशी ‘वांग्यांचे भरीत’ हे नाव जागतिक पातळीवर पोहोचविले.सकाळी ६ वाजेपासून सुरू झाली प्रक्रियाठरल्यानुसार २५०० किलो वांग्याचे भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करावयाचा होता. मात्र वांगी खराब निघून ती कमी पडू नये, यासाठी ३५०० किलो वांगी बामणोद ता.यावल येथून मागविण्यात आली होती. त्यातील ३२०० किलो वांगी निवडून गुरूवारी सायंकाळीच तुरकाठ्यांचे १० बेड करून त्यात भाजण्यासाठी ठेवण्यात आली होती. शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून भरीत बनविण्यासाठी कच्चामाल तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. तुरकाठ्यांचे बेड एकापाठोपाठ एक पेटवून वांगी भाजण्यास सुरूवात झाली.१० वाजून २० मिनिटांनी भरीत बनविणे सुरूसकाळी १० वाजून २० मिनिटांनी शेफ विष्णू मनोहर यांचे या विश्वविक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर लगेचच भरीत बनविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. सागरपार्क मैदानात मध्यभागी सिमेंटचा तात्पुरता ओटा उभारून त्यात खास कोल्हापूरवरून भरीत बनविण्यासाठी बनवून आणलेली ४५० किलो वजनाची कढई सिमेंटच्या ओट्यात बसविलेल्या लोखंडी स्टँडवर ठेवण्यात आलेली होती. त्याखाली चुलीप्रमाणे लाकडे घालण्यात आलेली होती.सर्वप्रथम तेलाचे डबे वजन मोजून कढईत ओतण्यात आले. तेल गरम झाल्यानंतर त्यात फोडणीचे साहित्य व भाजलेल्या वांग्यांचा गर टाकण्यात येऊन ते मिश्रण शेफ विष्णू मनोहर यांनी ११ फुटी सराट्याने ढवळून एक जिव केले. या प्रक्रियेत देवराम भोळे व दत्तु चौधरी हे त्यांच्या मदतीला होते. मिश्रण ढवळून झाल्यावर त्यावर कोथंबिर टाकण्यात आली. तसेच अवाढव्य कढईवर झाकण ठेवून भरीत शिजवण्याची प्रक्रिया सुरू झाली.भरीत शिजल्याने चुलीवरील विस्तव पाणी टाकून विझविण्यात आला व १२ वाजून १ मिनिटांनी कढईवरील झाकण काढण्यात आले. तसेच विश्वविक्रम झाल्याची घोषणा करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जळगावात ६ तासात ३ हजार किलो भरीत बनवून केला विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 5:54 PM
महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवार २१ डिसेंबर रोजी सकाळी सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने व १२० जणांच्या टीमच्या मदतीने ६ तासात ३ हजार किलो वांग्यांचे भरीत तयार करण्याचा विश्वविक्रम केला.
ठळक मुद्देशेफ विष्णु मनोहर यांनी १२० जणांच्या मदतीने केला पराक्रमखान्देशी ‘भरीत’ हे नाव पोहोचले जागतिक पातळीवर१२ वाजून १ मिनिटाने विश्वविक्रम पूर्ण